जगाला युद्ध नको बुद्ध हवे : अजय कढरे..

0
176

धुळे -७/५/२३

तथागत भगवान बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला.
भगवान बुद्धांच्या धम्म माणसामाणसांमध्ये बंधुभाव सदभावना व प्रेम निर्माण करणारा आहे.
बुद्धांच्या धम्मात समता आहे.
जगाला आता युद्धाची गरज नसून बुद्धांची गरज आहे.
जगाला तारण्यासाठी तथागत भगवान बुद्धांच्या धम्म हवा असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शिरपूर शाखा सभासद आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती सचिव अजय कढरे यांनी केले.
अजय कढरे पुढे म्हणाले की, भारताची ओळख ही तथागत भगवान गौतम बुद्धापासूनच आहे.
तथागत भगवान बुद्धांच्या धम्म हा धर्म नसून जगण्याच्या मार्ग आहे. सर्वांनी बौद्ध धम्म स्वीकारावा. तथागत भगवान बुद्धांनी सत्य शोधले. भगवान बुद्धांच्या धम्मात जाती नाहीत‌.
तथागत बुद्धांनी आपल्या उपदेशामध्ये अत्त दीप भव म्हणजे स्वयम् प्रकाशित व्हा असा उपदेश दिला.
आता आपण जुन्या रूढी परंपरा विसरायला हव्यात म्हणजे जसं परंपरेने चालून आले त्याच प्रकारे चालू ठेवावे असे नाही त्याच्यातलं सत्य आता ओळखायला हवं आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माने आता चालायला हवे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
भगवान बुद्धांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजे असेही अजय कढरे म्हणाले.
शिरपूर तालुक्यातील टेंभे बुद्रुक येथे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

तालुक्यातील टेंभे बुद्रुक येथे 5 में 2023 रोजी बुध्द पौर्णिमा निमित्त जगाला शांततेच्या संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा‌ व फलकाचे पूजन करून वंदन करण्यात आले.
याप्रसंगी सर्वांना बुध्द पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या. जय भिम, नमो बुद्धाय, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी गावातील पदाधिकारी व समाज बांधवांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून वंदन केले.

कार्यक्रमाचे आयोजन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती टेंभे बुद्रुक तर्फे करण्यात आले.

कार्यक्रमासाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती अध्यक्ष निलेश कढरे, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, शिरपूर शाखा सभासद तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती सचिव अजय कढरे, सदस्य मोहन कढरे, भैय्या कढरे, माजी उपसरपंच विमलबाई कढरे, उपाध्यक्ष सुरेश कढरे, सदस्य सागर कढरे, मनोहर कढरे, खजिनदार गौतम कढरे, सोपान कढरे, आनंद कढरे, दिपक मोरे, सागर ए कढरे, सतिष कढरे, राहुल कढरे, करण कढरे, प्रविण कढरे, रोहित पानपाटील, गणेश रामराज्ये आदी गावातील पदाधिकारी, नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवल कढरे ,शिरपूर प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here