खोकर गावात शासन आपल्या दारी मेळावा संपन्न ..

0
472

श्रीरामपूर -२५/५/२३

शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

spur
1
2

शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे.
बर्‍याचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात.

अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
त्यामुळे राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केला असून या माध्यमातून सरकारला थेट लोकांच्या दारात आणून प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शासनाच्या विविध योजनांची माहिती व आपल्या वैयक्तिक अडी अडचणी सोडविण्यासाठी आज. 25.5.2023 रोजी श्रीरामपूर तालुक्यातील खोकर गावात मेळावा आयोजित करण्यात आला होता.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यासाठी वडाळा महादेव गटातील तलाठी भाऊसाहेब श्री राजेश घोरपडे यांनी अपंग व्यक्तींकडून कागदपत्र घेऊन यांना लवकरात लवकर डोल चालू करून देण्याचे आश्वासन या वेळी दिले.
त्याचबरोबर उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करुन त्यांच्या अडचणी सोडवल्या.
पशुपक्षी वैद्यकीय अधिकारी, कृषी अधिकारी यांनी यावेळी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी खोकर गावचे ग्रामसेवक व सरपंच आशा चकनारायण व उपसरपंच दीपक पाटील काळे व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ..
या कार्यक्रमाचा लाभार्थ्यांनी फायदा घेतला
व ग्रामपंचायत व महाराष्ट्र शासन यांचे यावेळी गावातील गरजुवंतांनी आभार व्यक्त केले .
श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी श्री तात्यासाहेब शेरकर, एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here