नंदुरबार :- येथील डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये ११ ते २१ एप्रिल या १० दिवशीय ‘जल्लोष’ समर कॅम्पचे उद्घाटन शहरातील प्रसिद्ध डॉक्टर दीपक अंधारे यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन ॲड. परीक्षित मोडक, हास्य क्लब सदस्या कांचन मुलानी, शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा मोडक, पर्यवेक्षक श्रीराम मोडक आदी उपस्थित होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या समर कॅम्पमध्ये हास्य प्रकार, वारली पेंटिंग, योगासन व प्राणायाम, झटपट मेकअप, हेअर स्टाईल, नऊवारी साडी, हॉर्स रायडिंग, आनापान साधना, गाणे, हस्तकला, नाटक, चेस, मनोरंजनात्मक खेळ, झुंबा नृत्य, रांगोळी काढण्याच्या पद्धती, बॉक्सिंग, मेंदी काढणे, लेझीम, पोलीस शस्राश विषयी माहिती, सी.बी.गार्डन, वॉटर पार्क व सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम दहा दिवसात घेण्यात येणार आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सदर उपक्रमासाठी विद्यार्थिनींनी उस्फुर्त सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बी.एड. छात्र शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्रीराम मोडक व सूत्रसंचालन जितेंद्र पगारे यांनी केले. शांताराम पाटील यांनी आभार मानले.
एम.डी.टी.व्ही. न्युज, नंदुरबार