नंदुरबार -३१/५/२३
भारतीय देशाला स्वातंत्र्य लढ्याचा अजरामर इतिहास आहे
त्यात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी वीरांचे योगदान अतुलनीय आहे
ते विसरून कसे चालेल
त्याची स्मरण करून देणारा रावळपाणी हत्याकांड या लढ्याचा समावेश दिल्ली येथील राष्ट्रीय अनुसूचित जमात आयोग यांनी जाहीर केलेल्या स्वातंत्र्यलढ्यात करावा ही मागणी आमदार राजेश पाडवी यांनी केली
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मतदारसंघातील विकासाची पायाभरणी बरोबर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील वीरांचा भावी पिढीला ओळख व्हावी, त्यातून त्यांनी आदर्श घ्यावा त्यासाठी हा हत्याकांडाचा समावेश या स्वातंत्र्यलढ्यात करावा.. स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी वीरांच्या यादीत नंदुरबार जिल्ह्यातील गुलाम महाराज रामदास महाराज व रावळपाणी हत्याकांड यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल..
या दोन नेत्यांनी भारतात ब्रिटिश राजवटीविरुद्ध प्रखरपणे लढा देऊन ब्रिटिश राजवटीला सरो की पळो केलं
ब्रिटिश काळात सैनिकांनी परिसरातील निरपराध आदिवासींना ठार केलं होतं
जालियनवाला बाग हत्याकांडाचे सारखेच दडपशाहीचे क्रूर कृत्य इंग्रजांनी त्यावेळी केलं होतं
त्याचे सबळ पुरावे सरकारी संकेतस्थळावर देखील आज उपलब्ध आहेत
हा इतिहास पुसला जाऊ नये व या इतिहासाचे स्मरण पुन्हा व्हावे यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने याची दखल घ्यावी
आणि या लढायचा समावेश या यादीत करावा अशी मागणी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी केली..
नितीन गरुड ,तळोदा तालुका प्रतिनिधी ,एम डी टीव्ही न्यूज