पिंपळनेर :१६/३/२३
पिंपळनेर येथील नंदकुमार ढोले यांच्या देवापूर शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आलं..
एका घटनेत लांडग्याने शेळींचा बळी घेतला तर दुसऱ्या घटनेत बिबट्याने 11 बकऱ्या आणि तीन बोकडांना फस्त केलं
पिंपळनेर गावा नदी जेव्हा पूर शिवारात नंदकुमार ढोले यांच्या शेतात 13 मार्च रोजी बुधवारी रात्री कोंडलेल्या दहा शेळ्यांना लांडग्यांना नरडीचा घोट घेऊन ठार केलं.. तर एक शेळी उचलून नेली..
रात्री अपरात्री या घटनांमुळे जवळून राहणाऱ्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं..
रात्री नागरिकांनी बाहेर पडायचं की नाही असा प्रश्न आता निर्माण होऊ घातला आहे..
अंदाजे एक लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याचे समोर येतंय भरपाई मिळण्यासाठी वनखाते पिंपळनेर कडे अर्ज सादर करण्यात आला आहे…
तर एका दुसऱ्या घटनेत जेव्हापुर शिवारातील शेतात ढोले यांच्या शेतात बिबट्याने हल्ला चढवला आणि तब्बल 11 बकऱ्यांना फस्त केलं..
सदर घटनेबाबत पिंपळनेर वन विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली…
माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला..
पशुपालकाने नुकसान भरपाई त्वरित विभागाकडून मिळावी अशी मागणी केली आहे
एमडी टीव्ही न्यूज ब्युरो पिंपळनेर