नवापूर जि .नंदुरबार :१३/३/२३
राज्य सरकारला जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी 14 मार्चपासून बेमुदत संपावर विविध संघटना उतरत आहेत.. महाराष्ट्र राज्य कर्मचारी सामुदायिक संपावर जाणार असून त्यासंदर्भात धनराज तालुका नवापूर येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नुकताच निवेदन देण्यात आलं..
या केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देविदास चौधरी यांना निवेदन सादर केलं..
या संपा दरम्यान ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा ठप्प होतील मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना रुग्णांना करावा लागेल.. महाराष्ट्र शासनाने या संपाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा आपली भूमिका स्पष्ट करावी..
जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी यासाठी सर्व राज्य सरकारी कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत..
त्यामुळे उद्या 14 मार्चपासून होणाऱ्या बेमुदत संपामुळे विविध सेवांवर विशेषतः आरोग्य कर्मचारी संपात सहभागी होत असल्याने आरोग्य सेवा कोलमडणार हे निश्चित..
ग्रामीण भागात रुग्णांना मुळातच रुग्ण सेवा मिळण्यात दिरंगाई होते त्यात कर्मचारी संपावर जातात तेव्हा रुग्णांचा वाली कोण?
माननीय मुख्यमंत्री महोदय या प्रश्नावर गांभीर्याने लवकरच निर्णय घेतील हा विश्वास..
आणि बेमुदत संप लवकरात लवकर मिटेल आणि संपातून योग्य तो तोडगा निघेल हीच अपेक्षा
नारायण ढोडरे नंदुरबार ग्रामीण प्रतिनिधी एम.डी.टी व्ही न्यूज