साक्री : १४/३/२३
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसह विविध पाठिंबा देणाऱ्या समन्वय संघटनांनी 14 मार्चपासून राज्य सरकार विरोधात बेमुदत संप पुकारला आहे..
कारण तसंच आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी..
सर्वत्र जुनी पेन्शन योजनेवरून ठिकठिकाणी 14 मार्च रोजी राज्यभरामध्ये बेमुदत संप करण्यात आला..
कर्मचारी जे आपल्याला कार्यालयात दिसत होते आज ते आपल्या हक्कासाठी आणि मागण्यांसाठी संपात सहभागी होताना दिसले..
संघटना देखील या संपात सहभागी झाल्याचं दिसलं..
राज्यव्यापी संपात वर्ग तीन आणि चार चे कर्मचाऱ्यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.. महिलांची संख्या दर्शनीय होती..
विविध घोषणा देत एकच मिशन जुनं पेन्शन अशा घोषणा देण्यात आल्या..
राज्य सरकारने त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन योजना लागू करावी अन्यथा संप कायम राहील असा इशारा या माध्यमातून देण्यात आला..
त्यामुळे पुढील काही दिवस नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचे ठरेल..
जितेंद्र जगदाळे साक्री तालुका प्रतिनिधी एम.डी .टी.व्ही न्यूज