२००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद होणार ..

0
197

दिल्ली -२०/५/२३

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतलाय.

आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिककरा आणि जॉईनकरा.https://bit.ly/3UoK7E0

तसेच आरबीआयने इतर बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, असा सल्लाही दिला आहे.

इथून पुढे २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

३० सप्टेंबर २०२३ पर्यंत नागरिकांना या नोटा बँकेतून बदलून घेता येतील.

ग्राहकांना २ हजार रुपयांच्या नोटा देणं तातडीने थांबवा, असे आदेश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत.

‘क्लिन नोट पॉलिसी’च्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करणार असल्याची घोषणा केलीये. मात्र, असे असले तरी २००० रुपयांची लगेचच बंद होणार नाही किंवा चलनातून बाद होणार नाही.

मात्र इतर बँकांना २००० हजारांची नोट ग्राहकांना देऊ नका, अशी सूचना करण्यात आलेली आहे. या नोटा पुन्हा बँकेत जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंतचा कालावधी असणार आहे.

२३ मे पासून नोटा बदलता येतील

२३ मे २०२३ पासून तुम्ही बँकांमध्ये जाऊन २ हजारांच्या नोटा बदलून घेऊ शकता. परंतु एका वेळी केवळ २० हजार रुपयांच्या नोटाच अर्थात १० नोटाच तुम्हाला बदलता येतील.

२०१८-२०१९ मध्येच २ हजारांच्या नोटेची प्रिटिंग थांबविण्यात आली

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिककरा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0

दोन हजार रुपयांची नोट आरबीआय कायदा १९३४ च्या कलम २४ (१) अंतर्गत आणण्यात आली. जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर चलनाच्या गरजेमुळे या नोटा चलनात आल्या. दुसऱ्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात आल्यानंतर २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश फोल ठरला. त्यामुळे २०१८-२०१९ मध्ये २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

२ हजार रुपयांच्या नोटा कशा आल्या चलनात?

९ नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आश्चर्याचा धक्का देत देशात नोटबंदीची घोषणा केली होती.

याअंतर्गत १ हजार आणि ५०० रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बाजारात पुन्हा ५०० रुपयाची नवी नोट आणण्यात आली, मात्र १ हजार रुपयांच्या जागी २ हजार रुपयांची नोट आणण्यात आली होती.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर मोठी टीकाही झाली होती. मोठ्या किंमतीच्या नोटा चलनातून बाद करून पुन्हा २ हजार रुपयांची नवी नोट आणल्याने नोटबंदीचा नेमका उद्देश काय होता? असा प्रश्नही तेव्हा उपस्थित करण्यात आला होता. तसंच लवकरच ही नोट चलनातून बाद केली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. आता अखेर रिझर्व्ह बँकेने याबाबत निर्णय घेतला असून २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांना मुदत देण्यात आली आहे.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here