नाशिक :२४/२/२०२३
या मुलींनी देशात महिरावणी शाळा व गावाचे नाव उज्ज्वल केले असून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या विद्यार्थिनी आहेत महिरावणी येथील मातोश्री गि. दे. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या आठवीतील बालवैज्ञानिक कृत्तिका खांडबहाले आणि नववीची ऋतुजा काशीद.. नेमकी काय हि यशोगाथा यांची ..
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, डॉ. मार्टिन फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिले ‘हायब्रीड रॉकेट’ मिशन हे देशभरातील सहावी ते बारावीच्या पाच हजार विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या विकसित केलं.
तमिळनाडूतील पट्टीपलम् येथून स्पेस झोनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंदा मेगलिंगम, तेलंगणचे राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन तसेच इस्रोचे शास्त्रज्ञ, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम शेख, महाराष्ट्र राज्य सचिव मिलिंद चौधरी, समन्वयिका मनीषा चौधरी आदींच्या उपस्थितीमध्ये देशभरातील मुलांनी तयार केलेले १५० पिको उपग्रह अवकाशात यशस्वीरीत्या सोडण्यात आलं .
यावेळी महिरावणी शाळेच्या कृत्तिका खांडबहाले व ऋतुजा काशीद पालकांसह उपस्थित होते.
या मुलांनी तयार केलेले पिको सॅटेलाइट हे आकाशात उंचावर जाऊन काही काळ तेथील माहिती गोळा करू शकणार आहे.
स्पेस झोन इंडियाचे प्रमुख डॉ. आनंदा मेगलिंगम यांनी सांगितले, की शालेय बाल वैज्ञानिकांसाठी हे व्यासपीठ आहे, जे विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यास आणि या क्षेत्रात करियरच्या संधी शोधण्यास मदत करत असते.
महिरावणी येथील शाळेच्या या दोन्ही बालवैज्ञानिकांनी शाळेबरोबर गावाचे नाव मोठ केलंय .
कृत्तिका व ऋतुजा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
“मुलांनी बनवलेल्या ‘पिको सॅटेलाइट’ देशातील पहिला उपक्रम ठरला असून, त्याची जागतिक गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड होऊन एकूण पाच रेकॉर्ड केले आहे. ही बाब जिल्ह्याच्या तसेच महिरावणी शाळेच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे.” -बाळासाहेब सोनवणे, जिल्हा समन्वयक, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन यांनी प्रतिक्रिया दिलीय. कृतिका आणि ऋतुजा यांच्या पुढील वाटचालीस एम. डी. टी. व्हिच्या शुभेच्छा ..
तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज नाशिक