उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर व संचालक मंडळाचे स्पष्टीकरण
कोल्हापूर : स्वाभिमानी संघटनेने भोगावती साखर कारखान्याच्या साखर विक्रीबाबत जिल्हा पोलीस प्रमुख, प्रादेशिक साखर सहसंचालकांसह आमच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. त्या मागणीनुसार आम्ही त्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशी करत आहोत, या चौकशीतून जो निष्कर्ष निघेल त्यानुसार कारवाई करु, असे भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर व संचालक मंडळाने पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.
पाटील पुढे म्हणाले की, साखर परस्पर विक्री करण्याचा स्वाभिमानी संघटनेकडून वारंवार आरोप होत आहे. यातून कारखान्याची बदनामी होत आहे. आजपर्यतच्या आरोपामध्ये काहीही तथ्य आढळलेले नाही. भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या उठाठेवी सुरु आहेत. पण निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांचे वाभाडे काढूया, विनाकारण भोगावतीची बदनामी करु नका, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
साखर विक्री कायदेशीर मार्गाने होत आहे. कारखान्यातून बाहेर पडलेला ट्रक कोठे जातो? याची चौकशी आम्ही का करावी, पोलीस योग्य तो तपास करतीलच. यावेळी कार्यकारी संचालक संजय पाटील -पिरळकर, ज्येष्ठ संचालक कृष्णराव किरुळकर, ए. डी. पाटील, बी.आर.पाटील, हिंदुराव चौगले, संजयसिंह पाटील, शिवाजी कारंडे, प्रा. सुनील खराडे, डी. आय. पाटील, धिरज डोंगळे, रवि पाटील आदीसह अन्य संचालक उपस्थित होते.
सारिका गायकवाड एम.डी.टी.व्ही. न्युज कोल्हापूर