INTERNATIONAL SPORT COMPETITION:धावपटू रिंकी पावरा चीनला रवाना ..

0
394
''हारी बाज़ी को जीतना जिसे आता है.. ''

नंदुरबार :

रिंकीच्या वाटचालीला शुभेच्छा देतांना या ओळी आवर्जून एका चित्रपटातील आठवण करून देतात .. जरी ती दुर्गम भागातून युवतींचे आणि खेळाडूंचे प्रतिनिधित्व करतेय..
‘वो सिकन्दर ही दोस्तों कहलाता है ,हारी बाज़ी को जीतना जिसे आता है,
निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के..
वो सिकन्दर ही दोस्तों …
ये गलियां ,अपनी ये रस्ते अपने, कौन आएगा अपने आगे,
राहों में हमसे टकराएगा, जो हट जाएगा, वो घबरा के..
यहां के हम सिकन्दर …

वरील गाण्यातील ओळींना सार्थ करण्यासाठी आणि स्वतः ला सिद्ध करण्यासाठी निघालीय हि आदिवासी कन्या रिंकी .. सलाम तुझ्या धाडसाला आणि जिद्दीला .

येथील जी.टी.पाटील महाविद्यालयातील क्रीडा विभागाची विद्यार्थिनी रिंकी पावरा हिची नुकतीच विद्यापीठाच्या माध्यामातून आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झालेली आहे.
तिच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. रिंकी पावरा ही मूळची धडगाव तालुक्यातील अति दुर्गम भागातील खेड्यातील विद्यार्थिनी आहे.
ती सध्या जी. टी. पाटील महाविद्यालयात शिकत असून तिने महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा संचालक डॉ. टी. एल. दास यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदविला.

यहां के हम सिकन्दरधावपटू रिंकी पावरा

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
रिंकी पावरा हिची आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत निवड होण्यापूर्वी अश्वमेध विद्यापीठ स्पर्धेत रौप्य पदक, अंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत रौप्य पदक, अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत रजत पदक तसेच खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त करून दैदीप्यमान कामगिरी केलेली आहे. तेथून तिची निवड चेंगडू, चीन येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीसाठी झाली आहे.
ती दिल्ली विमानतळावरुन चीनला रवाना झाली आहे. महाविद्यालयाच्या विनंती नुसार रिंकी पावराचा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारा सर्व खर्च विशेष बाब म्हणुन क. ब. चौ. उ. म. विद्यापीठाने केला त्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी आणि विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील तसेच स्थानिक पातळीवर सर्व खर्च महाविद्यालयाने उपलब्ध करून प्रोत्साहन दिले त्याबद्दल रिंकीने आभार मानले.
रिंकी पावराने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल नं. ता. वि. समिती संस्थेचे चेअरमन तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नं. ता. वि. समिती संस्थेचे व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तथा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. एम. जे. रघुवंशी, संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.. तसेच रिंकीची कामगिरी उत्कृष्ठ होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रविण चव्हाण,प्रतिनिधी,एम डी टीव्ही न्यूज, नंदुरबार…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here