IPL 2023 Final Match : ‘यहा के हम सिकंदर’ या 5 कारणामुळे धोनीची चेन्नई पाचव्यांदा बनली चॅम्पियन!

0
392

मुंबई -३१/५/२३

धोनीचा अखेरचा आयपीएलचा सामना आणि समोर बलाढ्य गुजरात टीम. पण मैदानात जर धोनी असेल तर विजय निश्चित असतो हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

धोनीचा अखेरचा आयपीएलचा सामना आणि समोर बलाढ्य गुजरात टीम. पण मैदानात जर धोनी असेल तर विजय निश्चित असतो हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचं चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे.

आयपीएल 2023 मधील अंतिम सामना आज चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने गुजरातचा पराभव करून पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरल आहे. चेन्नईने अंतिम सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.

अंतिम सामन्यात टॉस जिंकून चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार एम एस धोनीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

तेव्हा गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करून 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स देऊन 214 धावा केल्या. यात गुजरात टायटन्सकडून सर्वाधिक 96 धावा साई सुदर्शन याने केल्या. साई सुदर्शन वगळत शुभमन गिलने 39 रिद्धिमान साहाने 54 तर हार्दिक पांड्याने 21 धावा केल्या.

तर चेन्नईच्या गोलंदाजांपैकी मेथीशा पथीरानाने 2 आणि दीपक चहर आणि जडेजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

गुजरातने विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 215 धावांचे आव्हान दिले असताना ते पूर्ण करण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्सचे फलंदाज मैदानात आले. परंतु पहिली ओव्हर सुरु होताच मैदानावर पावसाचे आगमन झाले. काहीवेळातच पाहूस थांबला परंतु पावसामुळे मैदानावरील काही भाग ओला झाल्याने सामना तब्बल 2 तास उशिरा म्हणजे रात्री 12 वाजून 10 मिनिटाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामना उशिरा सुरू होत केल्याने ही मॅच 15 ओव्हरची करण्यात आली.

त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्सला विजयासाठी 15 ओव्हरमध्ये 171 धावांचे टार्गेट देण्यात आले होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

चेन्नई सुपरकिंग्सला 171 धावांचे टार्गेट मिळाले असताना पुन्हा एकदा चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कोनवेची जोडी सलामीसाठी मैदानात उतरली.

चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने तडाखेबाज 26 रन्स केले. तर कोनवेनं निर्णायक 47 रन्सची खेळी केली. पण ही जोडी एकाच ओव्हरमध्ये माघारी परतली.

पण मैदानात शिवम दुबे अजूनही उभा होता. त्याच्या जोडीला अंबाती रायडू आला आणि त्यानेही रन्स कुठेही थांबले नाही पाहिजे अशी खेळी केली. 8 बॉल्समध्ये त्याने 2 सिक्स आणि 1 फोर मारून 19 धावांची खेळी करून आऊट झाला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

त्यानंतर कर्णधार धोनी मैदानात आला, त्याची सर्वच आतुरतेनं वाट पाहत होते. पण पहिल्याच बॉलमध्ये धोनी मिलरला कॅच देऊन बसला आणि शुन्यावर बाद झाला.

त्यानंतर शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणेनं टीमची कमान सांभाळली. एकीकडे दुबेची सावकाश खेळी सुरू होती तर दुसरीकडे रहाणेनं अनुभवी खेळाडू काय असतो हे दाखवून देत 2 सिक्स आणि 2 फोर लगावत मॅच फिरवली. पण 27 रन्स करून मोहीत शर्माने त्याला माघारी पाठवलं.

आता सामना संपला, मॅच हातातून गेली अशी सर्वांची भावना होती. पण सर जडेजा मैदानात आला. तिकडे गुजरातकडून मोहित शर्माने चेन्नई भोवती जाळ टाकलं. शिवम दुबेनं सिक्स लगावून सामना आणखी जवळ आणला. अखेरची ओव्हर मोहित शर्माची होती. आणि जिंकण्यासाठी 11 रन्स हे होते.

दुबेनं सिक्स मारण्याचा प्रयत्न केला पण यॉर्करमुळे डाव फसला.

मग काय जडेजाने अखेरच्या 2 बॉल्समध्ये एक सिक्स आणि दुसरा चौकार लगावून टीमला विजय मिळवून दिला आणि चेन्नईने पाचव्यांदा चॅम्पियन होऊन दाखवलं.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here