देशात सुरु असलेला आयपीलाचा थरार आता अंतिम पाडाववर पोहचलाय. काल दि. २३ पासून प्ले ऑफ सामने सुरु झाले आहेत २०२३ ची आयपीएल कोण जिंकेल ? कोणता खेळाडू कशी कामगिरी करणार ? आपली टीम कुठपर्यंत टिकेल, किंवा विजेते होईल का याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. आयपीएलचा धुमाकूळ सध्या सुरु असताना मात्र संघ आणि खेळाडूंसाठी एक महतवाची बातमी समोर येत आहे. आयपीएल जिंकणारी, उपविजेता संघ कोट्याधीश होणार असून स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा खेळाडू देखील मालामाल होणार आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
२०२३ च्या आयपीएल चे प्ले ऑफ सामन्यांना मंगळवार दिनांक २३ पासून सुरुवात झाली आहे. जी टीम आयपीएल मध्ये विजेती ठरेल त्या टीमला बीसीसीआयकडून तब्ब्ल वीस कोटींचे बक्षीस दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे जो संघ फायनल पर्यंत येऊन पोहोचेल परंतु पराभूत होईल अशा संघाला बीसीसीआय अंतर्गत १३ कोटीचे बक्षीस मिळणार आहे, त्याच बरोबर ज्या टीम्स प्ले ऑफ पर्यंत येऊन पोहोचेल असा टीमला सुद्धा सात कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे आता अंतिम टप्यात प्रत्येक संघ विजयासाठी अथक परिश्रम घेत असल्याचे दिसून येत आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
बीसीसीआय अंतर्गत चांगली कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना देखील मोठी रक्कम दिली जाणार आहे. त्यामध्ये सुपर स्ट्रायकरला १५ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऑरेंज कॅपला १५ लाखांची दिले जाणार. त्याचबरोबर पर्पल कॅपला १५ लाखाचे तर मॉस्ट वैलुएबल प्लेयर १२ लाख रुपये, सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूला १२ लाख दिले जाणार आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, मुंबई