ITI विद्यार्थ्यांचे विद्यावेतन ४० वरून ५०० रुपये होणार !

0
169

३६ जिल्ह्यासाठी कमिटी स्थापन : मंगलप्रभात लोढा यांनी केली मोठी घोषणा

मुंबई / नंदुरबार :- ITI अर्थात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून दरमहा असलेले विद्यावेतन ४० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

वाढत्या महागाईच्या काळात दरमहा ४० रुपये विद्यावेतन अतिशय कमी आहे, असा मुद्या अनेकदा उपस्थित करण्यात आला होता. अखेर राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांसाठी असलेले सद्याचे विद्यावेतन ४० रुपयांवरून ५०० रुपये करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

कुर्ला येथील डॉन बॉस्को इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे आयोजित केलेल्या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सुमारे तीन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. शिबिराच्या ठिकाणी विविध करिअर विषयक संधी, रोजगार-स्वयंरोजगार विषयक शासकीय योजना, देशातील आणि परदेशातील विविध शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक कर्जविषयक योजना आदींची माहिती देण्यात आली.

विशेषत: युवकांसाठी भविष्याची विविध नवीन क्षितिजे खुली व्हावीत, नवनवे अभ्यासक्रम, स्किल्स त्यांना माहीत व्हावेत यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात ६ जूनपर्यंत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

आयटीआयमधील कोर्सेस हे कालबाह्य झाले असून नवीन कोर्सेस बाबत सरकार पुढील वर्षी घोषणा करणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी दिली. राज्यातील ३६ जिल्ह्यासाठी एक कमिटी स्थापन केली असून प्रत्येक जिल्ह्यात ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी आवश्यक असणारे कोर्स घेतले जातील, अशी माहिती ना.लोढा यांनी शेवटी दिली.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो मुंबई, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here