नंदुरबारात रविवारी जगदंबा देवी अवतार मिरवणूक..

0
184

नंदुरबार :११/३/२०२३

नंदुरबार शहरात वर्षानुवर्षे सुरु असलेली होळी उत्सवातील जगदंबा देवी अवताराची प्रथा कायम सुरू आहे.

यावर्षी रविवारी सायंकाळी 6 वाजता शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मध्यरात्री श्री गणपती मंदिरात सांगता करण्यात येणार असल्याची माहिती मांगल्य सेवा संस्थेचे अध्यक्ष सुहास जानवे यांनी दिली.

श्री जगदंबा देवी अवतार मिरवणूक कै.भास्कररावजी जोशी यांच्या राहते घरानजीकच्या कमानी दरवाजा येथून सायंकाळी ०६ वाजता सुरु होईल. शिवाजी चौकातील होळीला प्रदक्षिणा घेऊन शिवाजी चौकाजवळ जुने मधुरम हॉस्पिटलच्या बाजूला स्टेजवर विराजमान होईल.

जळका बाजार, नगर परिषद टावर समोर, जळका बाजार मुख्य चौकात स्टेजवर, टिळकपथ, कालाणी यांचे घराजवळील मारुती मंदिर, शिरीष मेहता रोड, सराफ बाजार, टिळक पथ, फडके चौक ,गुळवाडी येथे स्टेजवर भाविकांसाठी दर्शना साठी विराजमान होईल.

त्यानंतर बालाजी वाडा, होळी प्रदक्षिणा व बालाजी मंदिरासमोर , सोनार खुंट, संकट मोचन मारुती चौक, विठ्ठल मंदिर येथे भाविकांच्या दर्शनानंतरश्री गणपती मंदिरात नजीक अवतार मिरवणुकीची सांगता करण्यात येणार आहे.
जीवन पाटील कार्यकारी संपादक एम डी टी व्ही न्यूज,नंदुरबार ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here