काकर्दे येथे “जय मल्हार”चा गजर !

0
103

भंडाऱ्याची उधळण : बारा गाडांची लांगड पाहण्यासाठी उसळला जनसागर

नंदुरबार : तालुक्यातील काकर्दे येथे प्रसिद्ध खंडेराव महाराज यांचा एकदिवशीय यात्रोत्सव काल मंगळवारी संपन्न झाला. ग्रामस्थ तसेच यावेळी पंचक्रोशीतील मल्हारी भक्तांनी भंडाऱ्याची उधळण करीत मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी भाविकांनी “जय मल्हार”चा गजर करीत बारा गाडांची लांगड ओढली. यावेळी जिल्हाचे पालकमंत्री विजयकुमार गावित हे उपस्थित होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

काकर्दे गावाचे संरपंच पुंडलिक भापकर यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने गावातील सकल आदिवासी समाज बांधवांना खंडेराव महाराज यांना यात्रेच्या दिवशी मानाचा पहिला नारळ अर्पण करण्याचा मान दिला. यात्रेचे हे मुख्य आकर्षण ठरले, या कृतीतून गावाच्या एकतेचे दर्शन झाले. प्रसिद्ध खंडेराव महाराज यांच्या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम अतिशय उत्साहात हा सोहळा ना.डॉ.विजयकुमार गावीत, नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य शांताराम पाटील, महेंद्र पटेल, सरपंच पुंडलिक भापकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

सन १९९० साली खंडेराव महाराजाच्या मंदिराचा जिर्णोद्धार लोकवर्गणीतून करण्यात आला आहे. गेल्या दीडशे वर्षापासून श्री.खंडेराव महाराज यात्रा भरते, यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे तिसरी पिढीतील श्री.खंडेराव महाराज यांचे सेवेकरी प्रकाश आनंद माळी यांनी बारा गाडे ओढले. प्रसिद्ध श्री खंडेराव महाराज यात्रेसाठी पंचक्रोशीतील तसेच विविध ठिकाणाहून मल्हारी मार्तंड भक्त उपस्थित होते. यावेळी शतपावली आकर्षण ठरली. तर “जय मल्हार”चा गजर करीत भंडाऱ्याची उधळण यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.
एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here