नंदुरबार -३/४/२०२३
जैन समाजाचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा 2622वा जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.
या निमत्ताने श्री सकल जैन समाज अक्कलकुवा च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
प.पू.खरतरगच्छाधिपति आचार्य भगवंत श्री जिनमणिप्रभसुरिश्वरजी म.सा. यांचा आज्ञानुवर्तिनी गच्छगणनी प.पू.साध्वी श्री सुलोचनाश्रीजी म.सा. यांचा शिष्या प.पू. साध्वी श्री प्रिय स्नेहांजनाश्रीजी म.सा. आदीं ठाणा 4 यांचा पावन निश्रेत यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले
यात भगवान महावीर यांचावर आधारित गीत गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्नोत्तरी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पालना सजावट स्पर्धा च्ये आयोजन करण्यात आले यात प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्याना विशेष पारितोषिक देण्यात आले.
सदर दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 8 वाजेला श्री वासुपूज्यस्वामी स्वामी जिनमंदिर येथून शोभा यात्रा काढण्यात आली
शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गाने हनुमान चौक, झेंडा चौक, फेमस चौक, मुख्य बाजार चौक, तलोदा नाका, महामार्ग, भंसाली चौक, आगीवाल चौक, झेंडा चौक, हनुमान चौक, जैन धर्मशाला होत जैन मंदिर येथे शोभायात्राची सांगता करण्यात आली.
शोभायात्रेत भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची आकर्षक सजावट, घोड्यावर बसून जैन ध्वज हातात घेऊन लहान मुले, असलेल्या सुशोभित पालकी ढोल, ताशा सह वाजत-गाजत शोभायात्रा काढण्यात आली.
अहिंसा परमो धर्म, वंदे विरम, भगवान महावीर स्वामी की जय’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सदर शोभायात्रेचा जैन आराधना भवन येथे धार्मिक सभेत रूपांतर करण्यात आले
यावेळी प.पू.साध्वी श्री प्रिय स्नेहांजनाश्रीजी म.सा. यांनी भगवान महावीर स्वामी यांचा जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
पश्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जैन स्थानक येथे आयोजन करण्यात आले
यात 60 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले
तसेच यावेळी स्वामीवात्सल्यच्ये आयोजन जैन धर्मशाला येथे करण्यात आले होते
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
तसेच दुपारी खापर येथील गौशाला येथे जीवदया कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
रात्री प्रभु भक्ति च्ये ही यावेळी आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जैन समाज बांधव, महिला, युवा वर्ग मोठय़ा संख्येने सहभागी झाला होता.
जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून मानवी जीवन समृध्द करणारे भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक महोत्सव अक्कलकुवा शहरात अभूतपूर्व उत्साहात यंदा साजरी करण्यात आली.
शुभम भंसाली,अक्कलकुवा तालुका प्रतिनिधि,एम डी टी व्ही न्यूज