Jalgaon : ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या ; मृतदेह गोठ्यात लपवला

0
9444
jalgaon-6-year-old-girl-was-tortured-and-killed

Jalgaon: संशयिताच्या अटकेसाठी कुटुंबियांसह नातेवाईकांनी भडगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन आंदोलन करत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला होता. दरम्यान, दोन दिवसांपासून मृतदेह कडब्याच्या कुट्टीत असल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार एक ऑगस्ट रोजी उघडकीला आला.

भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामधून लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेतील संशयिताला गुरुवारी पोलिसांनी अटक केली.

Jalgaon
image From sakal

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय 19) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलीशी झालेल्या झटापटीत तरुणाने मुलीच्या डोक्यात दगड टाकला आणि त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यामध्ये लपवून दिल्याची कबूली अटकेतील संशयिताने पोलिसांसमोर दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

या संशयिताला गुन्हृयाच्या घटनास्थळाची पडताळणी करण्यासाठी गावात घेऊन जात असताना पोलिसांच्या वाहनावर संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन पोलीस जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने Jalgaonजिल्हृयात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मुलगी मिळून येत नसल्याने मुलीच्या ती बेपत्ता झाल्यासह अपहरणाची तक्रार पालकांनी पोलीस स्टेशनला केली होती. तक्रारानुसार भडगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयिताच्या अटकेसाठी कुटुंबियांसह नातेवाईकांनी भडगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन आंदोलन करत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला होता. दरम्यान, दोन दिवसांपासून मृतदेह कडब्याच्या कुट्टीत असल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार एक ऑगस्ट रोजी उघडकीला आला.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ज्या कडब्याच्या कुट्टीत मृतदेह मिळाला तो गोठा स्वप्नील विनोद पाटील (वय १९, रा. गोंडगाव ता. भडगाव) याचा असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. संशयानुसार पोलिसांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी स्वप्निल याला अटक केली .३० जुलै रोजी दुपारी सदर मुलीला आमिष दाखवून संशयिताने त्याच्या गोठ्यात बोलाविले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर प्रकरण उघड होणार नाही म्हणून , तिच्या चेहऱ्यावर दगड मारून तिची निर्घृण हत्या केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here