शिरपूर तालुक्यातील तोंदे गावात खतांचा बनावट साठा जप्त..

0
303

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

शिरपूर /धुळे -१/५/२०२३

शेतकर्‍याने कृषी विभागाकडे पोटॅश खताच्या गुणवत्तेविषयी तक्रार केल्यामुळेे धुळे व जळगाव जिल्हा कृषी विभागाने संयुक्त कारवाई करून ९७ हजाराचा बनावट खतसाठा शिरपूर तालूक्यातील तोंदे येथून जप्त केला आहे.
याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार रमेश शिसोदे यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.२७ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जिल्हा गुण नियंत्रण निरिक्षक जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरूण श्रीराम तायडे यांनी भ्रमणध्वनीवर माहिती दिली
मौजे हातेड खु. ता.चोपडा येथील शेतकरी किशोर आत्माराम पाटील यांनी (एम.ओ.पी) या खताच्या गुणवत्तेविषयी तक्रार केली होती.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यावर तालुका कृषी अधिकारी चोपडा दीपक भास्करराव साळुंखे व अरूण श्रीराम तायडे यांनी सदर शेतकर्‍याकडे जावुन खताची तपासणी केली.
त्यांना सदर खतसाठा प्रथमदर्शनी बनावट असल्याचे आढळून आले.
त्यानंतर किशोर पाटील यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मंगलचंद झुंबरलाल जैन मु.पो.तोंदे, ता.शिरपूर यांनी त्यांना खताच्या सात बॅग दिल्याचे सांगितले.
प्रती बॅग १७०० रू. या बदल्यात जैन याने कुठलेही बिल अथवा पावती दिलेली नव्हती.
त्यामुळे बनावट खतसाठा असल्याचे समोर आले.
त्यानंतर किशोर पाटील यांच्याकडे असलेल्या बनावट खताच्या पिशव्या परत करण्यास सांगून कृषि सहसंचालक नाशिक विभाग मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, जिल्हा अधीक्षक कृशी अधिकारी जळगावचे संभाजी ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.
दि.२७ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास संशयित ठिकाणी म्हणजेच सुरजमल मोहनलाल जैन यांच्या किराणा दुकानावर छापा टाकला असता या ठिकाणी ९६ हजार ९०० रू. किंमतीच्या बनावट खताच्या ५७ बॅग आढळून आल्या.
अधिक चौकशीत हा खत साठा कैलास वासुदेव पाटील रा.तोंदे यांनी त्यांच्या घरात कापुस भरला असल्याने जागा नसल्याने किशोर पाटील यांना सांभाळण्यास दिल्याचे सांगितले.
त्यावरून कैलास वासुदेव पाटील याची चौकशी करण्यात आली.
कैलास पाटील याने उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी मंगलचंद झुंबरलाल जैन कैलास वासुदेव पाटील दोघे (रा.तोंदे, ता.शिरपूर) व किशोर शालिकराव पाटील (रा.करवंद ता. शिरपूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास थाळनेर पोलिसांकडून सुरू आहे.
सदरची कारवाई मोहन वाघ , जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी धुळे, कुरबान तडवी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जळगाव, संभाजी ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज शिसोदे जिल्हा गूणवत्ता नियंत्रण निरीक्षक धुळे, अरुण तायडे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव, दिपक साळुंखे तालुका कृषी अधिकारी चोपडा, योगेश गिरासे कृषी अधिकारी शिरपूर यांनी केली.
एम. डी. टीव्ही साठी राज जाधव ,शिरपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here