Jalgaon News : पत्रकार दिनानिमित्त रक्त तपासणी शिबिर, सत्कार समारंभ

0
185
jalgaon-news-blood-test-camp-on-the-occasion-of-journalists-day

Jalgaon News – आचार्य बाळकृष्ण जाबुळकर शास्त्री पत्रकार दिनानिमित्त भडगाव येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, तहसीलदार मुकेश हिवाळे, कृषी अधिकारी बागले यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मराठी पत्रकार संघ भडगावच्या वतीने रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पत्रकार बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. तसेच वृत्तपत्र विक्रेते व भारतीय जनता पक्षाचे माजी सैनिक समाधान भाऊ पाटील कोठली कर यांची माजी सैनिक जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल, जुनी पेन्शन धारक योजनेच्या प्रश्न शासन दरबारी मांडणारे आरोग्य सेवक संजय कैवाळीकर, गोंडगाव येथील समाजसेवक वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय साळुंखे यांचा सत्कार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी समाजसेवक विजय साळुंखे यांचा उल्लेख शिंदे गट सोडून मशाल हाती घेतलं असा उल्लेख केल्याने व संजय कैवारीकर जुनी पेन्शन धारक संजय मामा असा उल्लेख केल्याने कार्यक्रमात एकच हंशा पिकला. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक बापू परदेशी, लक्ष्मीकांत पाटील, रतिलाल पाटील, सतीश पाटील, आमिन पिंजारी, अकबर मिझा, अलीम शहा, मनीष सोनवणे, निलेश पाटील, भास्कर पाटील आदि पत्रकार बांधव हजर होते.

या शीर्षकात बातमीच्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे वर्णन केले आहे. तसेच, कार्यक्रमात झालेल्या सत्कार समारंभाबद्दलही माहिती दिली आहे. या शीर्षकामुळे बातमीची माहिती प्रभावीपणे पोहोचते.

सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here