पाचोरा /जळगांव -२४/४/२०२३
उद्धव ठाकरे यांनी जळगावातील पाचोऱ्यात सभा घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं.
उद्धव ठाकरेंनी महागाई, शेतकरी आत्महत्येचा मुद्दा मांडत सरकारला घेरलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडली.
या सभेत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर महागाईच्या मुद्यावरुन हल्लाबोल केला.
तर, राज्य सरकारवर बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घातला.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर देखील भाष्य केलं.
चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत उतरण्याचं आव्हान ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपला दिला.
शिवसेना कुणाची म्हणत निवडणूक आयोगावर हल्लाबोल-
सगळा जल्लोष बघितल्यावर शिवसेना कुणाची? हे दिसतयं!
पाकिस्तान सुध्दा सांगेल खरी शिवसेना कोणाची, पण निवडणुक आयोगाला मोतीबिंदू झालाय तो त्यांचा प्रश्न, असं उद्धव ठाकरे म्हणाले. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, महाराष्ट्र बघतोय.
काही जणांना वाटले तेच शिवसेना पण अशा अनेक घुशी आम्ही बघितल्या आणि निवडणुकीत आपटल्या.
आज खरच तात्यांची उणीव भासते, ४० गद्दार गेले तरी फरक पडत नाही पण एक निष्ठावंत गेले की उणीव जाणवते.
तात्यांच्या पुतळ्याचे अनावरण करावे लागेल असे वाटले नाही. वैशाली ताईंचा अभिमान असून त्यांचं घराणं हे शेतकऱ्यांच्या साठी झटणारे आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.








निवडून देणारे माझ्यासोबत
मेहनत तुम्ही करता आणि टिकोजीराव वर बसतात आता पुन्हा त्यांना खाली खेचण्याची वेळ.
निवडून आलेले गद्दार झालेत पण निवडून देणारे आजही माझ्या सोबतच आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. आपले सरकार होत तेव्हा करोनाचे जागतिक संकट होतं.
नैसर्गिक संकटात आपण सरकारमध्ये असताना मदत केली. आता सरकारच अवकाळी, यांनी एकाही संकटात मदत केली नाही मग हे बोलावेच लागणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जळगावातील कवी शेतकऱ्याची भेट झाल्याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला.
यावेळी त्यांनी पोलिसांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, असं आवाहन केलं. बहिणाबाई जर आज असत्या तर त्यांना पण या सरकारने तुरूंगात टाकले असते. बहिणाबाईंच्या कवितेच्या ओव्या त्यांनी वाचून दाखवल्या.
आईच्या कुशीवर वार करणारी गद्दारांची अवलाद आपली नाही.
काही लोक बाप बदलतात आणि बाप चोरतात. तुमच्या मेहनतीचे रक्त पिणारे हे गद्दार आहेत त्यांना मारायला तोफ नको.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
https://bit.ly/3UoK7E0
आज माझ्याकडे काही नाही पण तुम्ही आशीर्वाद देणारे हात माझ्या सोबत त्यांनी येऊन दाखवावे, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.
दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी त्यांनी वाचून दाखवली.
२६ वर्षाचा मुलगा आत्महत्या करतोय लोकसंख्येचे देशात अमाप पीक पण तरुण मुले आत्महत्या करताहेत.
राजा निवडायचा हक्क तुमचा आहे पण तुमच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत मोदी महागाई वर बोलायचे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालंय असेल तर हात वर करुन सांगा.
निवडणूक आली की अबकी बार आता यांना आपटा, असं आवाहन ठाकरे यांनी दिलं.
२०१४ युती तुटल्याची आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली.
तेव्हा खडसेंच्या गळ्यात युती तोडल्याचे खापर टाकले.
आज नाव चिन्ह नाही पण जनसागर उसळतोय हे शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आहेत.
आपल्यातील लोक बाहेर कसे जातील हे भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत आणि इतर पक्षातील भ्रष्ट पक्षात घेतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
संजय राऊतांचे कौतुक आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
https://bit.ly/3UoK7E0
नितीन देशमुख, राजन साळवी, वैभव नाईक जे माझ्या सोबत आहेत त्यांची छळवणूक सुरु आहे.
या एकदाचे जेल भरोच करुयात आव्हाने कसले देता नामर्दपणा करतायत.
राहुल गांधींबाबत पण तेच त्रास देणे सुरु आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मी घरीबसून जे सरकार चालवलं ते तुम्ही वणवण फिरुन पण तुम्ही करु शकत नाही.
घराणेशाहीत पण एक परंपरा असते. तुम्ही म्हणता फकीर पण तुम्ही निघून जाल पण जनतेचे काय?
वैशालीताई लढण्यासाठी माझ्यासोबत आहेत. वैशालीताईंच्या पाठीशी तुम्हाला राहावे लागेल, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं.
पाचोरा जिवंत आहे.
पाचोरा जिवंत आहे. भगव्यावर गद्दारांचा अधिकार नाही.
ज्याचे स्वतःचे काही नाही तेच चोरी करताहेत.
खारघरच्या दुर्दैवी घटनेची आठवण करत ठाकरेंनी सोहळ्याचा हेतूच वाईट होता असं म्हटलं.
भाजपला आव्हान देत असून त्यांनी जाहीर करावे ते मिंधेच्या नेतृत्वात लढणार आहेत का? असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तुम्ही मोदी आणि चोरलेले धनुष्यबाण घेऊन या मी माझ्या नावावर येतो.
आग दिसतेय म्हणून निवडणुका घेण्याची हिंमत होत नाही. आता निवडणुका लावा मी तयार आहे.
मशालाची धग अशी लावू की तुमचे सिंहासन हलेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र गद्दारांचा नाही वीरांचा
महाराष्ट्र गद्दारांचा नाही वीरांचा आहे. दोन्ही हात वर करुन वज्रमूठ दाखवा. वाट बघत होतो घुसणारे कधी घुसतायत. मी राज्यभर येणार आहे. तुमच्यावर पुढील निवडणुकीची जबाबदारी. महाराष्ट्र पिंजून काढणार गद्दारांची विल्हेवाट. दिवसा सूर्य आग ओकत असतो पण तुमची जी डोकी आहे ती तापली पाहिजेत असं सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाची आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली.
सतीश पाटील ,भडगाव प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज जळगांव ..