जनसंवाद अभियानाला यश : केळवा पोलिसांनी केला घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल प्राप्त..

0
174

पालघर: 7/6/23

ही घटना आहे 31 मे 2023 रोजी केळवा मांगेलवाडा येथील
फिर्यादीच्या घरी रात्री 10 ते 10:20 च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरची दरवाजाची कडी उघडली
आणि घरात प्रवेश केला
रुमाला गुंडाळून ठेवलेले सुमारे नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यासंदर्भात फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून केळवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 380 व 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
पालघर चे जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यामध्ये जनसंवाद अभियान सुरू केला आहे
भीमसेन गायकवाड प्रभारी अधिकारी केळवा पोलीस ठाणे यांनी केळवा मांगेलवाडा येथे भेट देऊन जनसंवाद अभियानांतर्गत बैठक घेतली
सदर बैठकीमध्ये लोकांना आपण कोळी बांधव आहात आपण आपल्या प्रामाणिकपणासाठी ओळखले जातात अशा प्रकारच्या चोऱ्या होणे आपणाकडून अपेक्षित नाही तरी ज्यांनी कोणी चुकून चोरी केली असेल त्यांनी आपल्या प्रामाणिकपणा दाखवावा व तीन दिवसाच्या आत चोरी केलेला मुद्देमाल परत करावा असं भावनिक आवाहन केलं
त्या आव्हानाला प्रतिसाद देत विश्वनाथ तांडेल यांच्या दारासमोर सहा जून 2023 रोजी सुमारे नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एकूण3,2,342 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने परत आणून ठेवले
या जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून या गुन्ह्याची उकल करण्यात पालघर पोलिसांना यश आलं
पोलीस आणि जनता यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण व्हावा या उद्देशातून या अभियानाची जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी होत असून जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना लाभदायी ठरत आहे.. त्यामुळे हा घडलेला घरपोडीचा गुन्ह्यातील मुद्देमाल परत मिळण्यात केळवा पोलिसांना यश आलं..
आणि त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केलंय
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,पालघर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here