झुलेलाल जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी..

0
147

शिंदखेडा :२४/३/२३

येथील सिंधी समाजातील आराध्य दैवत जय झुलेलाल यांची १०७३ वी जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

शिंदखेडा शहर सिंधी कॉलनी पासून मोटारसायकल रॅली काढण्यात आली

सदरची रॅली भगवा चौक, स्टेशन रोड, शिवाजी चौक , गांधी चौक , रथगल्ली, जनता नगर, माळी वाडा, देसाई गल्ली येथुन काढण्यात आली.

समाजातील नवयुवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लहान मुलां मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले सदर शिबिरात ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिरासाठी धुळे नवजीवन ब्लड ग्रुपचे योगदान लाभले.

समाजातील सहपत्निक आराध्य दैवत जय झुलेलाल सिंधी पखर चढविण्यात आले
. ह्यावेळी महाप्रसादाचा लाभ समाज बांधवांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घेतला.

पालखी मिरवणूक काढण्यात आली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा..https://bit.ly/36S6BFu

सिंधी समाजातील जय झुलेलाल जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मनोहर भोजवाणी, चंद्रकांत गोधवाणी, मनोज राजपाल, महेश गोधवाणी, नरेश वाधवा, प्रेम रहेजा, पवन वाधवा, रोहित भोजवाणी, चेतन वाधवा, छोटु राजपाल, सुनील गोधवानी, बंटी गोवंशाची, प्रदिप राजपाल, मोहन वाधवा आदी पदाधिकारी सहभागी होऊन जयंती साजरी करण्यात आली.

यादवराव सावंत,शिंदखेडा प्रतिनिधी, एम. डी. टी. व्ही. न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here