३० जून -महाराष्ट्रात राजकीय भूकंप …मुख्यमंत्री बदलले..

0
2322

मुंबई -३०/६/२३

महाराष्ट्राच्या राजकारणात जून महिन्यात भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. 20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर ते जवळपास चाळीस आमदारांसह गुवाहाटीला जावून धडकले. त्यानंतर बरोबर दहा दिवसांनी म्हणजे 30 जून रोजी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

देश हादरवून टाकणाऱ्या या सत्तांतराविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर जोरदार सुनावणी झाली. आतापर्यंत नेमके काय घडले, पुढे काय होणार? हे थोडक्यात जाणून घेऊ..

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

एकनाथ शिंदेंचे बंड:एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यानंतर 21 जून 2022 रोजी आपल्या समर्थक आमदारांसह सुरत आणि तिथून गुवाहटीला दाखल झाले. तेव्हा शिवसेनेने एकनाथ शिंदेंना कारवाईचा इशारा दिला. अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली. तसेच सुनील प्रभू यांची प्रतोदपदी नियुक्ती केली. याला उत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांनी प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली.

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

शिंदेंनी घेतली शपथ:

महाराष्ट्राकडे निघण्यापूर्वी एक दिवस अगोदर म्हणजेच 28 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांनी मिळून गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितरित्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

नियम काय सांगतो?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. ते मुख्यमंत्री झाले. मात्र, राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टातील तरतूद सांगते की, दोन तृतीयांशहून अधिक आमदारांचा गट फुटल्यास त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागते. मात्र, शिंदे यांचा गट कुठल्याही पक्षात विलीन तर झालाच नाही, पण त्यांनीच शिवसेनेवर दावा ठोकला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले.

ब्युरो रिपोर्ट ,एम डी टी व्ही न्यूज ,मुंबई …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here