कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको !

0
914

कजगाव येथील रस्त्याच्या कामासाठी रायल्टी भरून गौण खनिजांची परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी दि.१३ रोजी कजगाव बसस्थानक चौकात रास्तारोकोसह गावबंद आंदोलन करण्यात आले होते. यावेळी भडगावचे तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, फौजदार शेखर डोमाळे व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त लावला होता.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

गावातील रस्त्याच्या कामासाठी रायल्टी भरून गौण खनिजची परवानगी देण्यात यावी, अन्यथा रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी दिला होता. मागणी मान्य न झाल्याने दि.१३ रोजी गावबंदसह रस्तारोको आंदोलन करण्यात आले. सकाळी सव्वादहा वाजता सदरचे आंदोलन सुरू झाले. प्रसंगी लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन, उपसरपंच हाजी शे.शफी मण्यारसह महाजन यांच्या पॅनेलचे सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

1
2

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

कजगावच्या बसस्थानक चौकात झालेल्या या रस्तारोकोमुळे भडगाव-चाळीसगाव मार्गावर वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या आंदोलन सुरू होताच आंदोलन अंदाजे अर्ध्या तासापर्यंत सुरू होते घोषणाबाजी ने बसस्थानक चौक दणाणले होते. कजगाव ग्रामपंचायत हद्दीत गावातील अनेक रस्ते अत्यंत खराब झाले आहे. यासाठी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच व सदस्यांनी वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करुन निधी मंजूर केला. तसेच टेंडर सुद्धा मंजुर केले परंतु या रस्त्यांसाठी गौण खनिज नसल्याने रस्त्यांचे कामे रखडलेले. रॉयल्टी भरून गौण खनिजाची परवानगी द्यावी, असे निवेदन कजगाव ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे यांना दिले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

शासकीय यंत्रणेने कजगाव येथील रस्ते विकसित करण्याकरीता मंजुरी दिलेली आहे. सदरचे रस्ते विकसित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरचे काम दिले असुन काम करण्यासाठी कायदेशीर रॉयल्टीची रक्कम घेऊन कजगाव ग्रामपंचायत मालकीच्या जागेतुन गौण खनिजाची परवानगी द्यावी. शासनाने कजगांव येथील गावातील अनेक रस्ते अत्यंत खराब झाल्यामुळे, सदरचे रस्ते विकसित करण्याकरिता निधी मंजुर होऊन टेंडर पास होऊन, संबंधित अधिकाऱ्यांनी वर्कऑर्डर २० जुन रोजी कॉन्ट्रक्टर यांना दिलेली आहे. परंतु आपल्या कार्यालयामार्फत गौणखनिज वाहतुक परवाना मिळत नसल्यामुळे गावातील रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

निलेश पाटील. एमडीटीव्ही न्युज कजगाव (ता.भडगाव)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here