नंदुरबार -८/४/२३
नंदुरबार शहरातील गुजराती कासार कंसारा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील भांडी गल्लीत उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य श्री कालिका माता मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक उपक्रम घेण्यात आले.सायंकाळी निघालेल्या पालखी मिरवणुकीने भाविकांचे लक्ष वेधले होते.
हरिवंशी गुजराती कासार कंसारा समाजातील महिला मंडळ आणि युवक – पुरुष समाज बांधवांनी होऊन गतवर्षी चैत्र महिन्यात श्रीकालिकामातेचे भव्य मंदिर उभारले .
मंदिर वर्धापन दिनानिमित्त यंदा मूर्ती सह परिसरात रंगबिरंगी आकर्षक फुग्यांनी सुशोभीकरण करण्यात आले.
मंदिर निर्मितीपूर्वी दीडशे वर्षांपासून पुरोहित बाळू अग्निहोत्री यांच्या घरी पंचधातूतील मूर्तीची दैनंदिन पूजा होत असत.
गतवर्षी चैत्र कृष्ण प्रथम रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.कासार समाज बांधवांच्या सहकाऱ्यांनी नवीन मंदिरात कर्नाटक राज्यातील बागलकोट येथून साडेतीन फूट उंचीची मूर्ती आणण्यात आली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक कराआणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu
कासार समाजात पिढ्यानपिढ्यांपासून तांबे व पितळीचे भांडे तयार करणारे कारागीर आहेत.
अत्यंत मेहनतीनेे कुशल काम करणारे समाज बांधव दरवर्षी देवीच्या उत्सवात सहभागी होतात.
वर्षातून दोन वेळा दीपअमावस्यानिमित्त सामूहिक दीप पूजन करण्यात येते.
यंदा प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्रींचे अभिषेक, अभ्यंग, साज शृंगार, सामूहिक श्रीसूक्त पठाण विधिवत पूजन करण्यात आले .
याचबरोबर ध्वजारोहण श्री दुर्गा सप्तशती पाठवाचन, नैवेद्य आरतीी, महाप्रसाद आदी उपक्रम झाले.
सायंकाळी पादुका व प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
श्रीकालिका माता मंदिरा वर्धापन दिनानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत कासार समाज बांधव महिला, पुरुष, युवती यांनी मिरवणुकी दरम्यान गरबा नृत्य करून सहभाग नोंदविला.
प्रविण चव्हाण एम. डी टी.व्ही, जिल्हा प्रतिनिधी.नंदुरबार