खामगाव/बुलढाणा -२४/४/२३
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलीस ठाणे अंतर्गत कांचनपूर हे छोटसं गाव..
या भागातील अवैध दारू विक्री बंद करा या मागणीसाठी सातत्याने पोलीस ठाणेदारांना निवेदन देण्यात आलं होतं..
मात्र निवेदनाला केराची टोपली दाखवत ठाणेदारांनी कोणती कार्यवाही केली नाही..
अखेर ग्रामस्थांनी थेट अप्पर पोलीस अधीक्षकांना याबाबत नुकतच निवेदन सादर केलं..
कांचनपूर येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री केली जाते ती तातडीने बंद व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी अप्पर पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले..
नॅशनल अँटिक करप्शन अँड प्राईम कंट्रोल ब्युरो त्यांच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आलं..
जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांच्यासह मयूर मोरे, जिल्हा सचिव आम्रपाली वाघमारे ,जावेद सय्यद जिल्हा कोषाध्यक्ष सागर इंगळे, जिल्हा सदस्य किरण शेगोकार तसेच गावातील महिला छाया इंगळे, अनिता सोळंके, मंगला मुंडले आदी उपस्थित होते..
MDTV साठी पुरूषोत्तम कौसकार, बुलढाणा प्रतिनिधी