कर्नाटक : सिद्धरमय्या यांनी घेतली शपथ

0
157

कर्नाटकच्या बंगळुरुतील श्री कांतीरवा स्टेडीयमवर एका सोहळ्यात आज मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी डी.के. शिवकुमार यांनी शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी सिद्धरमय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यासह आठ मंत्र्यांना दुपारी गोपनियतेची शपथ दिली. याच स्टेडियमवर सिद्धरमय्या यांनी २०१३ साली मुख्यमंत्रीपदाची पहिल्यांदा शपथ घेतली होती. सिद्धरमय्या दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आहेत.

शपथविधी सोहळ्यानंतर राहुल गांधी यांचे भाषण झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, आम्ही निवडणुकीत पाच आश्वासने दिली होती. त्यांनी त्या पाच आश्वासनांची आठवण करुन देत आम्ही खोटी आश्वासने देत नाही, जे बोलतो ते करतो असे सांगितले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

राहुल गांधी म्हणाले, तास-दोनतासांत नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक पार पडेल. त्या बैठकीमध्येच आम्ही दिलेल्या पाचही आश्वासनांचे कायद्यात रुपांतर केले जाईल. शेतकरी, कामगार, छोटे दुकानदार, तरुणवर्ग यांचे रक्षण करणे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे आमचे धेय्य आहे. कर्नाटकच्या नागरिकांनी काँग्रेसला जी शक्ती दिली ती आम्ही कधीच विसरणार नाही. आम्ही अगदी मनापासून तुमच्यासाठी काम करु असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.

शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरमय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि मंत्री विधानभवनात पोहचले. विधानभवनात पोहचताच सिद्धरमय्या थेट आत गेले मात्र डी.के. शिवकुमार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर माथा टेकवला आणि त्यानंतर त्यांनी विधानभवनात प्रवेश केला.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, बंगळुरु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here