Shirpur : बालविवाह समाजाला लागलेली किड- सीईओ भुवनेश्वरी एस..

0
198

शिरपूर ,धुळे: १३/३/२३

बालविवाहाला कोणत्याही परिस्थितीत थारा देऊ नका.

बालविवाह समाजाला लागलेली किड आहे. ती किड नष्ट करणे गरजेचे आहे.

तसेच विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे. प्रतिबंधांसाठी 1098 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सीईओ भुवनेश्वरी एस. यांनी खंबाळे येथे बालविवाह प्रतिबंधक कार्यक्रमात केले.

मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट शिरपूर, शिरपूर एज्युकेशन सोसायटी व जिल्हा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंध जनजागृती कार्यक्रम खंबाळे येथील आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उदघाटन धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त सौ. कृतिबेन भूपेशभाई पटेल होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर.एन.पवार यांनी केले. कार्यक्रमात 8 वी व 9 वी च्या मुलींनी “बेटी हू मै बेटी” हे गीत सादर केले तसेच “आदिवासी नारे” या गितावर नृत्य सादर केले.

विद्यार्थिनी सोबत सीईओ भुवनेश्वर यांनी देखील ठेका धरला व नृत्याचा आनंद घेतला.

या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी बालविवाह समाजासाठी किती घातक असल्याचे मत मांडले.
गट विकास अधिकारी एस.टी.सोनवणे यांनी बालविवाहाचे तोटे यावर मार्गदर्शन केले.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिष चव्हाण व युनिसेफ जिल्हा समन्वयक नंदू जाधव यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम यावर व्हिडिओ व पीपीटी द्वारे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त सौ. कृतिबेन भूपेशभाई पटेल, श्रीमती अंजुबेन पटेल (इंग्लंड), समाज कल्याण सभापती कैलास पावरा (जि.प.धुळे), जि.प.सदस्य योगेश बादल, सरपंच सतीबाई आसाराम पावरा (खंबाळे), पोलीस पाटील सुनील शिलदार पावरा (खंबाळे), पंचायत समिती सदस्य दिनेश पावरा, आंबे सरपंच प्रतिनिधी प्रितम पावरा, आंबे उपसरपंच प्रतिनिधी शिवाजी पावरा, विनेश हिरालाल पावरा (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती), संजय रामदास कोळी, सुनील गंगाधर अग्रवाल, रणजीत आनंदा पाटील, भावसिंग कहाऱ्या पावरा, हिरालाल रघुनाथ कोळी, संजय गेंध्या पावरा, आनंदा आसाराम पावरा (ग्रामसेवक खंबाळे) उपस्थित होते.

नवल कढरे,शिरपूर तालुका प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज

naval kadhre shirpur pratinidhi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here