आदिवासी वस्तीत भांडण सोडविण्यावरुन चाकु हल्ला ….

0
643

धुळे -८/४/२३

तालुक्यातील पाटण येथील महादेव आदिवासी वस्तीत मामाशी भांडण का करित आहे.

असे बोलत भांडण सोडविण्याऱ्या सागर मोरे या तरुणावर चाकु हल्ला चढवला

म्हणून सदर तरुण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली

जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी शिंदखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील आशापुरी देवीची यात्रा भरविण्यात आली ..

यात्रा पाहण्यासाठी सागर आनंदा मोरे हा तरुण जात होता.

त्यावेळेस त्याच्या मामाशी काही जण वाद घालत भांडण करित होते.

ही घटना गुरुवारी रात्री आठ ते नऊ वाजेदरम्यान घडली असून भांडण का करित आहेत,असे बोलत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्याचा राग येवुन तिघांनी मामाला सोडून सागर मोरे याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

अशातच शिवीगाळ करत हाताबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.

तिघांपैकी एकाने चाकु काढून सागर याच्यावर वार केला.हा वार छातीवर पडल्याने रक्तबंबाळ अवस्थेत तो खाली पडला. जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून तिघांनी पळ काढला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडलेल्या सागर मोरे हयास स्थानिक लोकांनी तातडीने रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले.तेथुन पुढील उपचारासाठी हिरे वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले

असून सदर तरुणावर उपचार सुरू आहेत.

ह्या प्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री सागर मोरे यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली.

त्यानुसार तिघांविरुद्ध भादंवि कलम ३०७,३२३,५०६,५०४,३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शिंदखेडा शहरात व परिसरातील काही गावगुंड तरुण अशा चाकु हल्ल्याच्या घटना घडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोकळे फिरणे कठीण झाले ….

अशा तरुणांना कठोर कारवाई आणि शासन होवून पायबंद घालणे गरजेचे आहे. अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

यादवराव सावंत,शिंदखेडा प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज शिंदखेडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here