नंदुरबार -४/५/२३
दिनांक 01 मे रोजी महाराष्ट्र राज्याचा 63 वा वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील कवायत मैदानावर मुख्य ध्वजारोहण समारंभ कार्यक्रम सुरु असतांना सकाळी 11.00 वाजेच्या . सुमारास पोलीसांना माहिती मिळाली की, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कोळदा शिवारातील नरोत्तम पाटील यांचे बाजरीचे पिक असलेल्या शेतात एक 30 ते 35 वयाची अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती कोळदा गावातील नागरिकांकडून मिळाली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, उपनगर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील व अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
घटनास्थळी मृतदेहाची पाहणी केली असता, साडी व ब्लाउज परिधान केलेली एक अनोळखी महिला रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमीनीवर पडलेली होती.
तसेच मृत महिलेच्या गळयावर, मानेवर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारून बाजरी पिकाचे शेतात फेकुन दिले होते. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार येथे पाठवून तात्काळ नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 140/2023 भा.द.वि. कलम 302 अन्वये अज्ञात आरोपीताविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनास्थळावर मयताची ओळख पटु शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे, मोबाईल, CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तु मिळुन आलेली नव्हती. तसेच सदरचा गुन्हा हा कधी घडला याबाबत कोणतीही माहिती नसल्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे व मयत महिला कोण ? मयताचे मारेकरी कोण ? मारण्याचा उद्देश काय ? असे मोठे प्रश्न अजुनही पोलीसांपुढे उभे होते.
गुन्हा दाखल झाल्या पासून पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे हे नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथेच तळ ठोकून होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
बन्या सन्या पाडवी, (55 ) रा. कोळदा, ता.जि.नंदुरबार,
परान ऊर्फ प्रविण ऊर्फ पिंट्या धडू भिल, (40), रा. कोरीट, ता.जि.नंदुरबार यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
खूना सारखा गंभीर व क्लिष्ट गुन्हा उघड करुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास नंदुरबार जिल्हा पेालीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी रोख बक्षिस जाहीर केले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या अमंलदारांनी केली आहे.
प्रविण चव्हाण ,एम डी टीव्ही न्यूज, नंदुरबार.