नेर: येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा यासह व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्त नेर येथे दि. १० रोजी येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले समितीतर्फे रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी गावातील विद्यार्थी,विद्यार्थिनी तसेच महिलांनी मोठ्या उत्साहात स्पर्धेसाठी सहभाग नोंदविला. रांगोळी तसेच वकृत्व स्पर्धेतील सहभागी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच आर्थिक स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात आले.
रात्री ८ वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी नगर येथील प्रा.व्याख्याते तथा लेखक संतोष वीरकर यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जीवनपट उलगडून सांगितला. त्यांच्या व्याख्यानातून महिलांचा सन्मान, सर्व जाती-धर्माचा विचार करणारे महात्मा फुले, “आपल्यात बदल हवा असेल तर अनेक भाषांचे ज्ञात असलेच पाहिजे” … ” ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट ‘… त्याचं घर भुईसपाट “… स्त्री शिक्षणाचे महत्त्व…असे अनेक विचार त्यांनी व्याख्यानातून मांडले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नेर येथील प्रगतिशील शेतकरी ह.भ.प. तुकाराम माळी होते. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज खलाणे यांनी केले. तर दिनांक ११ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले समिती, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी येथील महात्मा ज्योतिराव फुले पुतळ्यास औक्षण, पुष्पहार, श्रीफळ वाहून अभिवादन केले. यावेळी नेर गावातून मिरवणूक काढण्यात आली.
दिलीप साळुंखे, एम.डी.टी.व्ही. न्युज धुळे