शिंदखेडा – येथील वीर एकलव्य नगरातील आदिवासी एकता परिषदेच्या कार्यालयात आज क्रांतीवीर खाज्या नाईक शहीद दिवस आठवण दिवस म्हणून साजरी करण्यात आला.
सुरुवातीला खाज्या नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे हस्ते करण्यात आले.
ह्यावेळी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, आदिवासी नेते रामनाथ मालचे, गुलाब सोनवणे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. खाज्या नाईक यांच्या शहीद दिवस निमित्ताने आदिवासी समाजातील अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी मनोगतात त्यांचे कार्य व समाजासाठी लढा व बलिदान ह्याविषयी माहिती विशद केली. त्यात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार, रामनाथ मालचे, नाना कुंवर, भुपेद्र देवरे, यांचा समावेश होता.
आदिवासी समाज अशिक्षित असला तरी क्रांतीवीर खाज्या नाईक यांचा आजच्या दिवशी बोध घेऊन आपल्या समाजातील तरुण पिढीला व्यसनमुक्त करावे. शिक्षणासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. लहान वयातच मुलांना शिक्षणासाठी आजच्या पालकांनी जागृत व्हावे असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक मिलिंद पवार यांनी केले.
ह्यावेळी आदिवासी एकता परिषदेचे गुलाब सोनवणे, भुपेंद देवरे, श्याम सोनवणे, आप्पा सोनवणे, नाना कुंवर, नामदेव महाले,भुरा सोनवणे, गोपाल फुले, मुकेश फुले, अजय मालचे, दयाराम सोनवणे, सागर सोनवणे, कैलास मालचे, संतोष महाराज, रमेश पिंपळे, अजय सोनवणे, दादाभाई गावीत, आप्पा गावीत, अनिल सनेर, रवींद्र ठाकरे, भैय्या ठाकरे, अजय पाडवी, पिंटु मोरे, सुभाष महाराज, लक्ष्मण मोरे, गजानन महाराज, दिनेश सोनवणे, राकेश गोणी, दादा पवार, इंदास मोरे, शिवदास सोनवणे, मच्छिंद्र मोरे आदी पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
यादवराव सावंत, एम.डी.टी.व्ही.न्यूज शिंदखेडा