मतदारांनी आमिषांना बळी पडू नये; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी
नंदुरबार – सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती ही संस्था आहे. बाजार समितीची निवडणूक यंदा अत्यंत महत्त्वाची असून, सत्ता आणि संपतीचा जीवावर निवडणूक लढवली जात आहे. कोणी कितीही आमिष दाखविण्याच्या प्रयत्न केला तरी त्यास मतदारांनी बळी पडू नये, असे आवाहन माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शिवसेनेतर्फे (शिंदे गट)शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवण्यात येत आहे. नंदुरबार तालुक्यातील अनेक गावांमध्ये शिवसेनेतर्फे उमेदवारांच्या प्रचार करण्यात येत आहे. यावेळी घेण्यात आलेल्या प्रचार सभेप्रसंगी माजी आ.रघुवंशी म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकासासाठी अनेक चांगले निर्णय घेतलेली आहेत. ज्यावेळी विरोधकांच्य हातात सत्ता होती त्यावेळी बाजार समिती डबघाईला आली होती. परंतु,आमची सत्ता आल्यानंतर आर्थिक परिस्थिती सुधारत जाऊन मोठ्या प्रमाणावर आज बाजार समिती नफ्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याप्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, पं.स सभापती माया माळसे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील, माजी सभापती विक्रमसिंग वळवी, कृउबा समिती माजी सभापती हिरालाल पटेल, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णदास पाटील, जि.प सदस्य देवमन पवार, पं.स सदस्य कमलेश महाले, तेजमल पवार, ताराचंद मालसे, शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे तसेच शिवसेना प्रणित शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे सदस्य यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एम.डी.टी.व्ही. न्युज, नंदुरबार