नंदुरबार, शहादा व नवापूरात लढती रंगणार ; अक्कलकुव्यात १५ जागा बिनविरोध
नंदुरबार : जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत असून माघारीनंतरचे चित्र स्पष्ट झाले आहे. काल माघारीअंती तळोदा व धडगाव बाजार समितीचे संचालक मंडळ बिनविरोध झाले आहे. तर अक्कलकुवा बाजार समितीतील १८ पैकी १५ संचालक बिनविरोध झाले आहेत. याठिकाणी तीन संचालक पदांसाठी लढत रंगणार आहे. तर नंदुरबार, नवापूर व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मात्र चुरशीच्या लढती होणार आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नंदुरबार जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी निवडणूक प्रकिया सुरु आहे. काल माघारीअंती धडगाव व तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व संचालकांच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १५ संचालकांच्या जागा बिनविरोध झाल्या असून तीन जागांसाठी लढत होणार आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ९१ जण रिंंगणात होते. काल अखेरपर्यंत ५४ जणांनी माघार घेतल्यानंतर १८ जागांसाठी आता ३७ जण रिंगणात आहेत. यामध्ये सहकारी संस्थेच्या मतदार संघ सर्वसाधारण संवर्गात १४, महिला राखीव ४, इतर मागासवर्गीय २, भटक्या जाती जमाती २, ग्रामपंचायत मतदार संघाच्या सर्वसाधारण जागेसाठी ४, अनुसूचित जाती जमाती २, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी २, व्यापारी व आडत्यांच्या मतदार संघात ४ व हमाल तोलारी यांच्या मतदार संघात ३ असे ३७ उमेदवार रिंगणात आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शहादा बाजार समितीसाठी सहकारी संस्थेच्या मतदार संघात सर्वसाधारण जागेसाठी २४, महिला राखीव ७, इतर मागासवर्गीय ४, भटक्या जाती जमाती ३ तसेच ग्रामपंचायत मतदार संघाच्या सर्वसाधारण संवर्गात १०, अनुसूचित जाती जमाती ४, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक ३, व्यापारी व आडत्यांच्या मतदार संघात ६ तर हमाल व तोलारी यांच्या मतदार संघात ४ असे शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एकूण १८ जागांसाठी ६५ उमेदवार रिंगणात आहेत.
नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी काल १७ जणांनी माघार घेतल्याने आता १८ जागांसाठी ३९ जण रिंगणात आहेत. तर अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १५ संचालकांच्या जागा बिनविरोध झाल्या असून ग्रामपंचायत मतदार संघातील अनुसूचित जाती जमातीसाठी व आर्थिकदृष्टया दुर्बल घटक या संवर्गातील जागांसाठी लढत होणार आहे. माघारीनंतरचे चित्र स्पष्ट झाले असून आता प्रचाराला वेग येणार आहे. प्रत्येक बाजार समितीवर आपला झेंडा फडकविण्यासाठी नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे.
एम.डी.टी.व्ही. न्यूज ब्युरो नंदुरबार.