कृउबा निवडणूक ; नंदुरबार, नवापूर, शहादासाठी शांततेत मतदान सुरु

0
110

नंदुरबार : जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडत असुन शांततेत मतदान सुरु आहे. धडगाव व तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध झाली असून आज नंदुरबार, नवापूर व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान घेण्यात येत आहे. यासाठी ६ हजार ८५६ मतदार मतदान करणार असून यासाठी जिल्ह्यात ३५ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मतदान प्रक्रियेसाठी सुमारे ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

21a51a9f 5fe9 4e4b 8a31 be3e30ee7fe9

प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १८ संचालकांच्या जागा असून अशा एकूण ५४ जागांसाठी १४१ उमेदवार भवितव्य आजमावित आहेत. आज दि.२८ रोजी नंदुरबार, नवापूर व शहादा या तीन कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजारसाठी समितीसाठी ३७ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी एकूण १६ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. २ हजार ५६० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ७० सहकारी संस्थांमधील ८३३, १३८ ग्रामपंचायतींमधील १२४५, २४५ व्यापारी, आडते तर २३७ हमाल तोलारी मतदारांचा समावेश आहे. यासाठी सुमारे १०० कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती ठाकूर यांनी दिली आहे. याठिकाणी दुहेरी लढत होत आहे.

शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ६५ उमेदवार रिंगणात आहेत. २ हजार ८३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून १२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.८४ सहकारी संस्थांमधील ९८६, १५१ ग्रामपंचायतीमधील १ हजार ३९०, २५० व्यापारी,आडते व २११ हमाल तोलारी मतदार मतदान करणार आहेत. सुमारे १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निरज चौधरी यांनी दिली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नवापूर कृउबा समितीसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी ३० सहकरारी संस्थांमधील २८५, १६ ग्रामपंचायतींमधील १ हजार ९४, ८० व्यापारी आडते असे १ हजार ४५९ मतदारांसाठी ७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शितल महाले यांनी दिली आहे.

नंदुरबार, नवापूर व शहादा बाजार समितीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली. तर दुपारी १२ नंतर गर्दी कमी झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे. दरम्यान मतदार राजा नेमके कोणाच्या बाजूने कौल बजावतो हे मतमोजणी नंतरच कळणार हे निश्चित.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here