शिंदखेडा /धुळे -२६/६/२३
GOOD NEWS : जनता हायस्कूल शिंदखेडा येथील विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक लक्ष्मीकांत सोनवणे यांनी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम बक्षिस मिळवले ..
तसेच कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व समाजसेवा केल्याबद्दल त्यांना लोकराजा राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज २६ जून २०२३ रोजी जयंतीचे औचित्य साधून रायबा बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या तर्फे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं
दि २५ जून २०२३ वार रविवार रोजी दुपारी २ वाजता ज्येष्ठ नागरिक भवन संतोषी माता चौक धुळे येथे आयोजित कार्यक्रमात .प्रतिभाताई चौधरी महापौर धुळे, .बिपिन पाटील अध्यक्ष क्रांती ज्योत प्रतिष्ठान, गोरख देवरे ,ॲड.राकेश पाटील अध्यक्ष रायबा बहुउद्देशीय संस्था, प्रफुल्ल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं..लक्ष्मीकांत सोनवणे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार म्हणून स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
लक्ष्मीकांत सोनवणे यांना ज्येष्ठ नागरिक भवन संतोषी माता चौक धुळे येथील पुरस्कार मिळाल्याबद्दल अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना शिंदखेडा, जितेंद्र राजपूत ,शिंदखेडा तालुका अध्यक्ष, हेमंत चित्ते उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर माळी सचिव , मुकेश वाघ सहसचिव, योगेश गोसावी कोषाध्यक्ष, सचिन पाटील, सहकोषाध्यक्ष-भूषण पवार , प्रसिद्धीप्रमुख – यादवराव सावंत सर ,महिला पदाधिकारी रिना पाटील अध्यक्ष, रीना वाघ- उपाध्यक्ष, रितांजली राजपूत – सचिव आणि जनता विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मनोहर गोरख पाटील जनता हायस्कूल, प्राचार्य .एम.डी.बोरसे , पर्यवेक्षक यु.ए.देसले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच भोई समाजातील मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज