तरवाडे येथील गोशाळेचे शेड झाले जमीनदोस्त..

0
269

पारोळा /जळगांव -२१/४/२३

पारोळा तालुक्यातील तरवाडे येथील रविदास महाराज यांच्या गोशाळेचे गाईंची शेड पूर्णतः जमीनदोस्त झाले..
लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे
वादळाचा वेग एवढा होता की पत्रे एक ते दीड किलोमीटर दूर उडून गेले आहेत

तालुक्यात जवळपास 40 ते 45 डिग्री तापमान असताना गाईच्या निवारा हा उडून गेल्याने गाईंचा गोठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
गोशाळा अगोदरच चारा टंचाईचा सामना करत असताना वादळी वाऱ्याचे नवीन संकट उभे राहिल्याने पारोळा भडगाव तालुक्यातील गोभक्तांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे
सदरची माहिती ही पारोळा येथील कृषी विभाग व महसूल विभागाला कळविण्यात आली आहे ..

आमदार चिमणराव आबा पाटील यांनी लक्ष घालून शासनातर्फे मदत मिळवून देण्याची मागणी होत आहे..
सतीश पाटील ,भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज जळगांव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here