पंतप्रधान रोजगार निर्मिती मेळाव्यातून दिले स्वयं रोजगाराचे धडे ..

0
216

नंदुरबार : २३/३/२३

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत राज्य व केंद्र शासनातर्फे स्वंय रोजगाराला प्राधान्य देण्यात येत आहे.

स्वतःच्या जागेवर उद्योग उभारताना केवळ कोटेशन न देता प्रत्यक्षात व्यवसाय करणे गरजेचे आहे.

अर्जदाराचा सिबिल चांगला असेल तर बँक देखील प्राधान्य देते.

कर्ज परतफेडीसाठी युवकांनी प्रामाणिक प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक सचिन गांगुर्डे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ तर्फे श्रावणी येथे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय जनजागृती मेळावा झाला.

मेळाव्याचे उद्घाटन महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून करण्यात आले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.
जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी खादी व ग्रामोद्योग आयोग सूक्ष्म लघु आणि मध्य उद्योग मंत्रालय भारत सरकार पीएमईजीपी योजनेअंतर्गत उपक्रमाबाबत प्रास्ताविकातून माहिती दिली.

नवापूर पंचायत समितीचे माजी सभापती रतिलाल कोकणी यांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन करून कामाची निष्ठा ठेवून ध्येय साध्य करता येते असे सांगितले.

या जनजागृती मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून श्रावणीच्या सरपंच मोनिका कोकणी, संदीप कोकणी, ग्रामसेवक स्वप्निल पाडवी, बँक ऑफ बडोदा श्रावणी शाखेचे शाखा अधिकारी विशाल ठाकरे, बैसाणे उपस्थित होते.

जनजागृती मेळावा यशस्वीते साठी खादी ग्रामोद्योगचे लेखापरीक्षक आर. बी. गवांदे, सचिव योगेश बधान, प्रभारी औद्योगिक परिवेक्षक आर. के. खेडकर यांनी परिश्रम घेतले.
सूत्र संचालन उपसरपंच सुरज कोकणी यांनी केले.

आभार योगेश बधान यांनी मानले.

जनजागृती मेळाव्यास श्रावणी गावासह परिसरातील बचत गटाच्या महिला आणि बेरोजगार युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रविण चव्हाण एम. डी. टी.व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here