जाणून घेऊ या १२ मार्च दिनविशेष महत्व..

0
205

नाशिक : १२/३/२०२३

या दिनाचे विशेष महत्व सांगायचे म्हणजे आजच्या दिनी समाजविकासातील पहिली जागतिक परिषद संपन्न झाली होती. त्याच प्रमाणे १२ मार्च या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती तसेच घडलेल्या ऐतिहासिक घटनांबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.

  • १२ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 12 March Historical Event
  • सन १३६५ साली ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी वियना येथे विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली.
  • इ.स. १७५५ साली अमेरिकेमध्ये वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा वापर खादानीतून पाणी काढण्यासाठी करण्यात आला होता.
  • सन १९०४ साली ब्रिटेन देशांत लाईन वर चालणारी पहिली इलेक्ट्रिक रेल्वे सुरु करण्यात आली.
  • इ.स. १९११ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग करण्यात आला होता.
  • सन १९३० साली महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला सुरुवात केली होती.
  • इ.स. १९९३ साली मुंबईमध्ये झालेल्या बारा बॉम्बस्फोट मालिकेच्या प्रकरणात तीनशेपेक्षा जास्त माणसे ठार तर हजारो लोक जखमी झाले होते.
  • सन १९५४ साली भारत सरकार मार्फत साहित्य अकादमी पुरस्काराचे उद्घाटन करण्यात आले.
  • इ.स.१९९९ साली सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधी यांचीच प्रतिमा छापण्यात येण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला.
  • सन २००१ साली स्वातंत्र्यसेनानी आणि पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृति पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
  • १२ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 12 March Birthday / Jayanti / Birth Anniversary
  • सन १८९१ साली मराठी रंगमंच अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता व नाटककार चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९४ साली कोको कोला कंपनीने सर्वप्रथम कोको कोला बाटलीत भरून विकण्यास सुरवात केली.
  • सन १८३८ साली ब्रिटीश रसायनशास्त्रज्ञ सर विलियम हेनरी पर्किन यांचा जन्मदिन.
  • इ.स.१९११ साली गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा जन्मदिन.
  • सन १९१३ साली स्वातंत्र्य भारताचे पाचवे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि  पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९३३ साली मराठी लेखिका व कवयित्री विश्वनाथ नरवणे यांचा जन्मदिन.
  • सन १९८४ साली भारतीय पार्श्वगायक श्रेया घोशाल यांचा जन्मदिन.
  • या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 12 March Death / Punyatithi /Smrutidin
  • इ.स. १९६० साली भारतीय इतिहासकार क्षितीमोहन सेन यांचे निधन.
  • सन १९९९ साली प्रसिद्ध अमेरिकन व्हायोलिनवादक आणि वाद्यवृंद संचालक यहुदी मेनुहीन्न यांचे निधन

लेखन आणि संकलन : तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here