चरणमाळ घाटात अवैध मद्यासह २२ लाख ५७ हजाराचा मुद्देमाल जप्त ; नवापूर पोलीसांची धडक कारवाई…

0
217

नंदुरबार :- महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या अवैध मद्याची वाहतूक प्रकरणी पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळत तब्ब्ल २२ लाख ५७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनार नवापूर पोलिसांनी केली आहे. पोलिसांच्या या कारवाईने अवैध मद्य विक्री करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

गुजरात राज्यात दारुबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून अवैध दारुची चोरटी वाहतूक होणार नाही. तसेच अवैध दारुची तस्करी करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दिनांक १२ जून रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत नवापूर, गुजरात राज्यातील व्यारा व चलथान येथील काही इसम एकत्र येवून चारचाकी वाहनाने ( क्र. एमएच. २० इएल ३१७७ ) महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली व दादरा-नगर हवेली आणि दिव व दमन येथे विक्रीसाठी असलेली विदेशी दारु अवैधपणे विक्री करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, चरणमाळ घाट, नवापूर मार्गे गुजरात राज्यात वाहतूक करणार आहेत. त्यावरूनजिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सदर माहिती नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना देवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

हे सुध्दा वाचा

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी – MDTV NEW

शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. – MDTV NEWS

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

मिळालेल्या बातमीच्या आधारे नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने चरणमाळ घाटाच्या पायथ्याशी सापळा रचला. चरणमाळ घाटाकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना दिनांक १३ जून रोजी सकाळी ४.३० वाजेच्या सुमारास एक चारचाकी मोठे वाहन व त्याच्या पाठीमागे एक काळ्या रंगाचे स्कॉर्पीओ
वाहन भरधाव वेगाने येतांना दिसले. पोलीस पथकातील अमंलदारांनी हातातील टॉर्चच्या सहाय्याने वाहन उभे करण्याचा इशारा दिला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघून गेले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग केला. वाहन चालकाने सदरचे वाहन नवापूर तालुक्यातील बोरझर फाट्यावर सोडून तीन जण काळ्या रंगाच्या वाहनामध्ये बसून तेथून पळून गेले.

हे सुध्दा वाचा

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. – MDTV NEWS

मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी – MDTV NEWS

सदरच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात १२ लाख ५७ हजार ८४० रुपये किमतीचे Imperial Blue Hand Picked Grain Whisky चे
३०१ खोके, त्यात १८० एम.एल.च्या एकुण १४,४४८ काचेच्या बाटल्या. १ लाख २ हजार रुपये किमतीचे All Seasons Golden Collection Reserve Whisky चे २५ खोके, त्यात १८० एम.एल.च्या एकुण १२०० बाटल्या. १० लाख रुपये किमतीचा एक अशोक लेलैंड कंपनीचा ट्रक ( क्रमांक एमएच २० – ईएल ३१७७ असा एकुण २२ लाख ५७ हजार ८४० रुपये किमंतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. वाहन सोडून पळून गेलेले तीन संशयीत व काळ्या रंगाच्या स्कॉर्पीओ वाहनातील दोन आरोपी यांचेविरुध्द् नवापूर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई), ८३, १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उप निरीक्षक मनोज पाटील, पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, दिनेशकुमार वसुले, पोलीस अंमलदार दिनेश बाविस्कर, प्रशांत खैरनार, पवन काकरवाल, परमानंद काळे यांच्या पथकाने केली आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here