अक्कलकुव्यात सव्वाआठ लाखांचा मद्यसाठा जप्त

0
147

भांग्रापाणी – मोलगी रस्त्यावर राज्य उत्पादन विभागाची कारवाई

नंदुरबार : सातपुड्याच्या कुशीतील अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी ते मोलगी रस्त्यावर पिकअप वाहनासह ८ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादनच्या शुल्क पथकाने केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादनच्या भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी ते मोलगी रस्त्याने मद्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला असता संशयित वाहन (क्र.एमएच.०४ – डीके.९४१६) आले असता सदर वाहन अडवून त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीत वाहनात बियरचे ८२ बॉक्स, रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे २४ बॉक्स आढळून आले. पथकाने पिकअप वाहनासह ८ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ad1b5127 9558 4d32 ad89 36585a61ab94

सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत राज्य उत्पादनचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, विभागीय उपायुक्त डॉ.बी.एच.तडवी, राज्य उत्पादनच्या नंदुरबार अधिक्षक स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डी.एम.चकोर, दुय्यम निरीक्षक एस.आर.नजन, दुय्यम निरीक्षक पी.जे.मेहता, प्रशांत पाटील, सागर इंगळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मोहन पवार, जवान हंसराज चौधरी, संदिप वाघ, धनराज पाटील, भूषण चौधरी, मानसिंग वळवी, हितेश जेठ, अविनाश पाटील, हेमंत पाटील, आर.एन.पावरा, राहूल साळवे यांच्या पथकाने केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास निरीक्षक डी.एम.चकोर करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here