स्थानिक गुन्हे शाखा – शेती साहित्य चोरी करणाऱ्या तीन आरोपीतांना ठोकल्या बेड्या..

0
167

नंदुरबार -२७/४/२३

मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील काही पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागात शेतकरी बांधवांचे शेती साहित्य चोरीच्या घटनांबाबत नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना तक्रारी प्राप्त होत होत्या.
तसेच शेतकरी बांधव स्वत: देखील त्यांना भेटत होते.

घडलेल्या घटना कष्टकरी शेतकरी बांधवाच्या भावनांशी निगडीत होत्या व चोरी झालेल्या शेती साहित्यांमुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत होत्या.
म्हणून पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणे बाबत निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.

वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील काही पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागात झालेल्या शेती साहित्य चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, चोरीची पध्द्त व वेळ यांची इत्यंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील, मालमत्तेविरुध्द्च्या गुन्ह्यातील जेलमधुन सुटुन आलेल्या गुन्हेगारांवर पाळत ठेवून होते.
तसेच आपले बातमीदारांमार्फत देखील माहिती काढत होते.
दिनांक 24 एप्रिल रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मागील काही दिवसांमध्ये शेताती शेती साहित्य चोरीचे गुन्हे हे तळोदा तालुक्यातील आमलाड गावात राहणारे हरीष गोसावी, अरुण गोसावी व भरत पाडवी यांनी मिळून केली असल्याची बातमी मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ संशयीतांना ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळोदा तालुक्यातील आमलाड गावात जावून माहिती काढली असता ते तळोदा येथे गेल्याचे समजून आल्याने पथकाने तळोदा येथे येवून त्यांचा शोध घेतला असता तळोदा शहरातील चिनोदा चौफुली परिसरात तीन इसम संशयास्पद स्थितीत फिरतांना मिळून आले .

म्हणून त्यांचेवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून नाव गाव विचारले असता हरीष कांतीलाल गोसावी (23) अरुण हिरालाल गोसावी (23) भरत शांतीलाल पाडवी (35) सर्व रा. आमलाड ता. तळोदा जि. नंदुरबार असे सांगितले.

ताब्यात घेतलेल्या तिन्ही संशयीत इसमांना शेती साहित्य चोरीच्या गुन्ह्यांबाबत विचारले असता ते उडवा-उडवीची उत्तरे देवू लागले.

म्हणून त्यांना स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार येथे आणून विश्वासात घेवून अधिक विचारपूस केली असता त्यांनी मागील काही दिवसांमध्ये तळोदा तालुक्यातील आमलाड, तळवे, मोड, चिनोदा व नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी येथील शेतातून रात्रीच्या वेळी ठिबक नळी व लोखंडी नागर चोरी केले बाबत सविस्तर हकिगत सांगितली.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना चोरी केलेले ठिबक नळी व लोखंडी नागर बाबत विचारले असता त्यांनी चोरी केलेले ठिबक नळी व लोखंडी नागर हे हरीश गोसावी याचे आमलाड येथील घराच्या पाठीमागे झाकून ठेवलेले असले बाबत सांगितल्याने 66 हजार रुपये किमतीचे ठिब नळ्या व 2 लाख 25 हजार रुपये चार लोखंडी नागर व 1 लाख 70 हजार रुपये किमतीचे गुन्हा करते वेळी वापरण्यात आलेले 2 वाहन असा एकुण 4 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जप्त मुद्देमालाबाबत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यांचा गुन्हे अभिलेखाची पडताळणी करुन पाहिले असता खालील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे समजून आले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

ताब्यात घेण्यात आलेले आरोपी व जप्त मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, असे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील सांगितले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक विशाल नागरे, बापु बागुल, शोएब शेख यांच्या पथकाने केली आहे.
प्रविण चव्हाण ,एम डी टी व्ही न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here