लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी
मतदार जनजागृती कार्यक्रम SVEEP अंतर्गत
एकाच दिवशी २,३४,३८८ मतदारांना मतदान स्लीप चे वाटप बीएलओ मार्फत करण्यात आले.
यासाठी जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी मतदार संघातील बीएलओ यांना लेखी आदेश निर्गमित करुन नियोजन दिले होते. त्यानुसार नंदुरबार मतदार संघातील चारही विधानसभा क्षेत्रातील कार्यरत बीएलओ यांनी एकाच दिवशी २ लाखांपेक्षा जास्त मतदारांना मतदान स्लीप चे वाटप केले.
मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्र, मतदार यादीतील नाव याबाबत शोधाशोध करावी लागू नये म्हणून मतदार स्लीप महत्त्वपूर्ण आहे. या स्लीप द्वारे मतदार सहज मतदान केंद्रापर्यंत जाऊन आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करू शकतात. यासाठी नंदुरबार लोकसभा मतदार संघात प्रत्येक मतदारापर्यंत मतदान स्लीप वाटप बाबत नियोजन देण्यात आले होते.
मात्र एकाच दिवशी जास्तीत जास्त मतदारापर्यंत मतदान स्लीप चे वाटप व्हावे यासाठी सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील बीएलओ यांची बैठक घेऊन नियोजन केले होते.
स्वतः नोडल अधिकारी सावनकुमार यांनी नंदुरबार विधानसभा मतदार संघातील टोकरतलाव या मतदान केंद्रावर जाऊन तेथील मतदारांना मतदान स्लीप चे वाटप केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, केंद्रप्रमुख, शिक्षक, मतदान केंद्राचे बीएलओ उपस्थित होते.