अकोला : २८/३/२३
राज साहेब ठाकरे जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री विठ्ठल रावजी लोखंडकर साहेब ,जिल्हाध्यक्ष राजेश काळे ,शहर संघटक अरविंद शुक्ला, शहराध्यक्ष राकेश शर्मा, तसेच जिल्हा उपाध्यक्ष सतीश फाले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजीनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वॉल कंपाऊंड व सुशोभीकरण करण्यासाठी
म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना मनसेच्या वतीने दहा लक्ष रुपयाची मागणी करण्यात आली.
श्री छत्रपती शिवाजीनगर येथील स्मारका च्या बाहेरील जे कंपाउंड आहे ते अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे
व त्या समोरील जो स्पेस आहे तो अतिक्रमणाने वेढलेला आहे
त्या ठिकाणी दिवसभर खूप मोठ्या प्रमाणात घाण टाकले जाते
व त्याचबरोबर लोट गाड्या या पडून असतात.
याकरिता वारंवार मनपाला निवेदन देऊन सुद्धा त्यांनी अजून पर्यंत त्या अतिक्रमणावर तसेच रात्रीच्या होणाऱ्या घाणीवर कुठल्याही प्रकारचा आळा घातला नाही
ज्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केले ते
त्या ठिकाणी अरेरावी करून स्थानिकांसोबत वादविवाद करतात
तसेच त्यामुळे त्या एरियातील लहान मुलांना ,वयोवृद्ध लोकांना ,व महिलांना बाहेर निघण्यासाठी असुरक्षितता वाटते
या संपूर्ण गोष्टीला आळा घालण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही मागणी केली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
यावेळी मनसे शहर प्रसिद्ध प्रमुख प्रेम पाटील, यांनी ही मागणी केली त्या वेळी सनी ससाने विभाग अध्यक्ष, पवन राऊतकर, आदी उपस्थित होते
अशोक भाकरे,अकोला प्रतिनिधी ,एम. डी. टी. व्ही. न्यूज