M.N.SENA:अमित ठाकरेंचा विद्यार्थ्यांसोबत संवाद..विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणार : ठाकरेंची ग्वाही..

0
282

शहादा /नंदुरबार-20/7/23

सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि नवनिर्माण सेना विद्यार्थी संघटनेच्या पुनर्बांधणीसाठी महासंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर संघटनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी बुधवारी शहादा येथे भेट देत विद्यार्थ्यांसोबत यावेळी संवाद साधला.. अमित ठाकरे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर प्रथमच आले होते..
पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्र संपर्क दौऱ्यावर होते..

1
2
3
4

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

त्यानंतर त्यांनी बुधवारी शहादा येथे विद्यार्थ्यांसोबत विविध विषयांवर संवाद साधला.. प्रसंगी त्यांनी ते सोडवण्याचे आश्वासन देखील विद्यार्थ्यांना दिले.. पक्षात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न राहील ग्रामीण भागातील समस्या समजून घेत शिक्षणाच्या समस्या सोडवण्यावर राज्यपातळीवर भर राहील अशी ग्वाही संवाद दौऱ्या दरम्यान अमित ठाकरेंनी दिली.. शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन यावेळी केलं.. विद्यार्थ्यांच्या या सभेस विद्यार्थ्यांनी अमित ठाकरेंना उत्तम प्रतिसाद देत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते..
संजय मोहिते ,शहादा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here