सातपुड्यात महाआरोग्य कुंभ; तापी, नर्मदेच्या दऱ्याखोऱ्यातील ग्रामस्थांना मोठा दिलासा Maha Arogya Kumbh in Satpura

0
774
Maha Arogya Kumbh in Satpura

Maha Arogya Kumbh in Satpura Nandurbar  – छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्व रोग निदान महाआरोग्य शिबिरात रविवारी ३ हजारांवर रुग्णाची मोफत तपासणी करण्यात आली.जिल्ह्यातील तसेच परिसरातील नर्मदा,तापी व सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यातील ग्रामस्थांनी शिबिराच्या लाभ घेतला.

नंदुरबार येथील छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल तर्फे रविवारी मोलगी येथे ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

Maha Arogya Kumbh in Satpura

यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख ॲड.राम रघुवंशी,नंदुरबार पालिकेच्या माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी,धडगावचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा, अक्कलकुवा धडगाव विभागाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे,सावे, जि.प सदस्य विजय परडके, जि.प सदस्य सी.के पाडवी, पं.स उपसभापती भाईदास अत्रे,मोलगी सरपंच ज्योती तडवी, बिजगव्हाण सरपंच रोशन पाडवी,माजी सभापती उषाताई वळवी,शिवसेनेचे धडगाव तालुका प्रमुख संदीप वळवी,अक्कलकुवा तालुका प्रमुख रायसिंग वळवी,युवासेना जिल्हा प्रमुख योगेश पाटील,उपजिल्हा प्रमुख बबुआ राणा आदी उपस्थित होते.

डॉ.रोशन भंडारी,डॉ. त्रंबक पटेल,डॉ.प्रीती सूर्यवंशी,डॉ.चेतन सूर्यवंशी,डॉ.कपिल दुसेजा,डॉ.कपिल पाटील यांनी रुग्णाची तपासणी केली तर त्यांना छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

आरोग्य सेवेतून कोणीही वंचित राहू नये

शिबिराच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी बांधवांची आरोग्य सेवा करण्याची संधी मिळाली.रुग्ण सेवेतून कोणीही वंचित राहू नये.जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची निर्मिती केली.शासनाच्या सर्व आरोग्याच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

Maha Arogya Kumbh in Satpura

चंद्रकांत रघुवंशी,माजी आमदार

या आजारांवर तपासणी

मेंदूचे आजार,लखवा, मुत्ररोग, छाती,पोट,हाडाच्या मणक्याचे आजार,सिकलसेल, कुष्ठरोग,किडनी,कर्करोग, टि.बी,मूळव्याध, कान, नाक, घसा आदी आजारांची मोफत तपासणी करण्यात आली.

प्रतिनिधी – प्रविण चव्हाण  सह शुभम भंसाली एम डी टीव्ही न्यूज नंदुरबार….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here