Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!

0
55

23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार

केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती

अर्ज भरण्याची अंतिम दि २९ ऑक्टोबर रोजी

निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचार संहिता लागू

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा नुकतीच निवडणूक आयोगाने केली असून पुढील नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024  पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे. विधानसभेचे मतदान दिनांक 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात  घेण्यात येणार आहे तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहेत…

सणासुदीच्या काळात निवडणुकांची घोषणा केली जात नाही.

यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा होणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत…

मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे, पैसे वाटप करणे, ड्रग्स वाटप करणे, दारूचे वाटप करणे यावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष असणार आहे. सर्वत्र चेकपोस्टवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. २४ तास चेकींग होणार आहे. एक्साईजचे अधिकारी आणि इतर अधिकारी चेक पोस्टवर राहतील.

मतदानासाठी रांगा असल्या तर त्या ठिकाणी खुर्ची ठेवण्यात येणार आहे. यामुळे ज्येष्ठ मतदार किंवा महिलांना त्या ठिकाणी काही वेळ खुर्चीवर बसता येणार आहे. तसेच मतदान केंद्रांमध्ये मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा असणार आहे.

८५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांसाठी घरुन मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. त्या लोकांकडून फार्म १२ भरुन दिला जाणार आहे. हा फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही सोबत घेतले जाईल. सर्व गोष्टींची व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे. त्याचे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना पेपरमध्ये तीनवेळी माहिती द्यावी लागणार आहे. सर्व पोलिंग स्टेशन दोन किलोमीटरच्या आत असावेत, यासाठी निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे.

निवडणूक आयोगाकडून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. तसेच ज्या जेष्ठ मतदारांचे घरी जाऊन मतदान करुन घेण्यात येणार आहे, त्यांचीही व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे.

हिरालाल मराठे नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here