कोल्हापुरात साजरी करा उन्हाळ्याची सुट्टी, ‘ही’ ठिकाणं पाहून मन होईल फ्रेश..

0
195

कोल्हापूर -१८/४/२३

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये परिवारासोबत फिरताना कोल्हापूर शहर आणि परिसरातील या ठिकाणांना भेट दिलीच पाहिजे. 

दहावी-बारावी तसंच शाळेच्या परीक्षा आता संपल्या आहेत. तुम्ही या सुट्टीत फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर  परिसरात पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत.

कोल्हापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला या दिवसात अनेक पर्यटक भत देत असतात. चालुक्य कालखंडातील हे ऐतिहासिक मंदिर स्थापत्य शास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे.

5 5
1
6 4
2
7 2
3
8 3
4
9 1
5
10 2
6

अंबाबाई मंदिराच्या अगदी जवळ असणारा रंकाळा तलाव हे ठिकाण देखील पर्यटकांच्या यादीतील महत्त्वाचे नाव आहे. या तलावाचा सुंदर असा नजारा, तलावाच्या बाजूने तटबंदी आणि बगीचा, खाण्यापिण्याच्या विविध गोष्टिंचे स्टॉल या ठिकाणी मिळून जातात. त्यामुळे पर्यटकांची पाऊले आपसूकच या ठिकाणी वळतात.

टेंबलाई मंदिर, टेंबलाईवाडी रोड : कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकापासून अगदी ५ मिनिटांच्या अंतरावर असलेले टेंबलाई मंदिर या ठिकाणाला देखील तुम्ही भेट देऊ शकता. शहराच्या अगदी जवळच हे शांत असे एक ठिकाणी आहे. या टेंबलाई टेकडीवर टेंबलाई किंवा त्र्यंबोली देवीचे आणि यमाई देवीचे मंदिर आहे.

न्यू पॅलेस : नवीन राजवाडा अर्थात न्यू पॅलेस हे देखील एक संग्रहालय आहे. कसबा बावडा रोडवर असणारा हा राजवाडा म्हणजे आजचे, श्रीमंत शाहु महाराजांचे निवास्थान आहे. तर राजवाड्याच्या आतील बाजुस छत्रपती शाहु महाराजांच्या वस्तु संग्रालयासाठी जागा केली आहे. इथं लागूनच एक बाग असून त्या बागेत प्राणी संग्रहालय आहे.

कोल्हापूर शहरातच असणारे टाऊन हॉल हे वस्तुसंग्रहालय अतिशय उत्तम माहितीचे भांडार आहे. या वस्तुसंग्रहालयामध्ये जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वीच्या कोल्हापूरचा इतिहास उलगडणाऱ्या अनेक गोष्टी पाहता येतात.

बुद्धकालीन लेणी, पोहाळे : श्री क्षेत्र जोतिबा येथे वडणगे, कुशिरे मार्गाने जाताना पोहाळे येथील बुद्धकालीन लेणी हे देखील भेट देण्यासाठी अत्यंत चांगले ठिकाण आहे. कोल्हापूरपासून १५ किमी अंतरावर ही लेणी आहेत. रोडवरून थोड्या आतल्या बाजूला गेल्यानंतर डोंगराच्या कुशीत या लेणी पाहता येतात.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

रजाई पठार : गगगबावडा तालुक्यातच अतिशय प्राचिन असे मोरजाई पठार हे देखील पर्यटकांसाठी उत्तम ठिकाण आहे. या पठारावरून परिसरातील दृश्य अतिशय रमणीय दिसते. हे पठार संपूर्ण जांभ्या खडकामध्ये आहे. मोरजाईचे मंदिर हे गुंफेत आहे. इथे विविध वीरगळ, सतीगळ, युगुल प्रतिमा, एकल प्रतिमा अशा अनेक प्रतिमा पाहायला मिळतात.

गगनगिरी आश्रम मठ, गगन बावडा रोड : कोल्हापूर शहरापासून ६० किमी लांब असणारा गगनबावडा तालुक्यात गगनगिरी महाराजांचा मठ देखील उत्तम पर्याय आहे. या ठिकाणाहून दिसणारे निसर्गसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणी सर्वत्र हिरवी चादर पांघरलेले डोंगर बघून मन प्रसन्न होऊन जाते.

चिन्मय गणेश, टोप : पुणे-बेंगलोर महामार्गावरून कोल्हापूरला जाताना टोप गावाजवळ एक उंचच उंच गणेशमूर्ती दिसते. चिन्मय मिशनने कर्नाटकातून 50 कारागीरांकडून 18 महीन्यात ही मूर्ती बनवून घेतली आहे. 24 फूट उंचीच्या ध्यानगृहावर ही 61 फूट उंच अशी बैठी गणेशमूर्ती आहे.

सारिका गायकवाड ,प्रतिनिधी ,कोल्हापूर ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here