बाजार समिती निवडणूक निकाल: मविआ आणि भाजप-शिवसेनेत जोरदार टक्कर, जाणून घ्या सर्व अपडेट्स
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीची सत्ता कायम. राष्ट्रवादीचे १७ उमेदवार आघाडीवर
अकोला बाजार समितीवर राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपप्रणीत सहकार आघाडीची सत्ता आली आहे. या बाजार समितितील सर्व १८ जागांवर एकतर्फी विजय झाला आहे. तर वंचित समर्थित पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडाला.
सांगली : इस्लामपूर बाजार समितीत राष्ट्रवादीचं वर्चस्व, १८ पैकी १७ जागा जिंकल्या
भूम कृषी उत्पन्न बाजार समितीवर युतीचा झेंडा, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत गटाचे १३ उमेदवार विजयी, भाजपाने ४ जागा जिंकल्या, महाविकास आघाडीला १ जागा.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या अनुसूचित जाती जमाती गटातून भास्कर गावित 361 मतांनी विजयी
भुसावळ बाजार समितीत भाजप-शिंदे गटाचे शेतकरी विकास पॅनल आघाडीवर. १८ पैकी १५ जागांवर भाजप-शिंदे गटाला विजय मिळणार असल्याचा भाजप आमदार संजय सावकारे यांचा दावा.